सब-लेफ्टनंट आस्था पुनिया बनल्या नौदलाच्या पहिल्या महिला फायटर ; ‘हे’ घातक लढाऊ विमान उडवणार

Sub-Lieutenant Aastha Punia । भारतीय नौदलात पहिल्यांदाच एक महिला फायटर पायलट बनली आहे. सब-लेफ्टनंट आस्था पुनिया या नौदलात फायटर पायलट बनल्या आहेत. असे करणाऱ्या त्या पहिल्या महिला पायलट आहेत. भारतीय नौदलात आधीच टोही विमान आणि हेलिकॉप्टर स्ट्रीममध्ये महिला पायलट आहेत, परंतु आस्था पुनिया या लढाऊ विमान उडवणार आहेत. देशाच्या सुरक्षेत नौदल महत्त्वाची भूमिका बजावते. आता यामध्ये आस्थाची भूमिका आणखी वाढणार आहे. नौदलाने सोशल मीडियावर याबद्दल माहिती देखील दिली आहे.
आस्था पुनिया नौदलाच्या पहिली महिला फायटर Sub-Lieutenant Aastha Punia ।
भारतीय नौदलाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये आस्था पुनियाचा फोटो देखील त्यात समाविष्ट करण्यात आला आहे. नौदलाने शेअर केलेल्या आपल्या पोस्टमध्ये, “नौदलाच्या हवाई दलात एक नवीन अध्याय जोडला गेला आहे. भारतीय नौदलाने ०३ जुलै २०२५ रोजी भारतीय नौदल हवाई तळावर दुसरा बेसिक हॉक कन्व्हर्जन कोर्स पूर्ण करून एक ऐतिहासिक टप्पा गाठला. लेफ्टनंट अतुल कुमार धुळ आणि एसएलटी आस्था पुनिया यांना रिअर अॅडमिरल जनक बेवली, एसीएनएस (हवाई) यांनी ‘विंग्स ऑफ गोल्ड’ प्रदान केले.”असे म्हटले आहे.
A New Chapter in Naval Aviation#IndianNavy marks a historic milestone with the graduation of the Second Basic Hawk Conversion Course on #03Jul 2025 at @IN_Dega.
Lt Atul Kumar Dhull and Slt Aastha Poonia received the prestigious ‘Wings of Gold’ from RAdm Janak Bevli, ACNS (Air).… pic.twitter.com/awMUQGQ4wS
— SpokespersonNavy (@indiannavy) July 4, 2025
नौदलाने एका सोशल मीडियाच्या पोस्टद्वारे माहिती देत आस्था पुनिया नौदल विमान दलाच्या लढाऊ प्रवाहात सामील होणारी पहिली महिला पायलट बनली असल्याचे सांगितले आहे.
आस्था पुनिया कोणते लढाऊ विमान उडवतील? Sub-Lieutenant Aastha Punia ।
आस्थाला कोणते लढाऊ विमान मिळेल याबद्दल अद्याप अधिकृत माहिती नाही. भारतीय नौदलाकडे काही विशेष प्रकारचे लढाऊ विमान आहेत, जे आयएनएस विक्रांत आणि आयएनएस विक्रांतमधून उड्डाण करू शकतात. नौदलाकडे मिग-२९ लढाऊ विमान आहे. ते विशेषतः डिझाइन केलेले आहे. त्याची लढाऊ श्रेणी ७२२ किमी आहे, तर सामान्य श्रेणी २३४६ किमी आहे. ते ४५० किलो वजनाचे चार बॉम्ब, क्षेपणास्त्रे आणि इतर शस्त्रे वाहून नेण्यास सक्षम आहे.





