पोलीस उपनिरीक्षक सतीश जगताप यांना आंतरिक सुरक्षा सेवा पदक जाहीर
Updated On:

शिरूर (प्रतिनिधी) : देशातील नक्षलग्रस्त व जोखमीच्या भागात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पोलिस उपनिरीक्षक सतीश बाळासाहेब जगताप यांना आंतरिक सुरक्षा सेवा पदक जाहीर झाले आहे. पोलिस उपनिरीक्षक सतीश जगताप हे मूळचे शिरूर तालुक्यातील शिरसगाव काटा येथील रहिवासी असून गेल्या पाच वर्षांपासून ते गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील येलचील पोलिस मदत केंद्र येथे नेमणुकीस आहेत.
यापूर्वी ही त्यांना राज्य सरकारच्या गृह विभागाच्या वतीने विशेष सेवा पदकाने गौरविण्यात आले होते. आता केंद्र सरकारच्या गृह विभागाच्या वतीने त्यांना आंतरिक सुरक्षा सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. घरची परिस्थिती सर्वसाधारण असूनही पोलिस गडचिरोली सारख्या दुर्गम भागात बजावत असलेल्या सेवेबद्दल शिरसगाव काटा ग्रामस्थांच्या वतीने जगताप यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.





