Pimpri : विद्यार्थ्यांनी साकारले संतांचे रूप

पिंपरी : आषाढी एकादशीनिमित्त शहरातील शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात असून विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या समृद्ध संत परंपरेची ओळख करुन दिली जात आहे. यानिमित्ताने विद्यार्थी संतांच्या आणि वारकऱ्यांच्या वेशभूषेत येऊन शाळेत पालखी सोहळ्याचा आनंद घेत आहेत.
चिंचवड स्टेशन येथील श्री प्राथमिक जैन विद्या मंदिर चिंचवड स्टेशन या शाळेमध्ये आषाढी एकादशी निमित्ताने भक्तीमय वातावरणात शालेय पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. पारंपारिक वेशभूषा, टाळ मृदुंगांच्या गजरात संपूर्ण परिसर जानोबा माऊलीच्या जयघोषाने दुमदुमून गेला.
विद्याध्यर्थ्यांनी संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत जनाबाई, संत नामदेव आदी संतांच्या वेषात सुंदर सादरीकरण केले. विठ्ठल रखुमाईच्या रुपातील विद्याथ्यांची झलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. पालखी प्रस्थान, फुगडी, रिंगण या उत्साही वातावरणात परिसर चैतन्यमय झाला. आरोग्य दिंडी या आगळ्या क्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्वच्छता, पोषण आणि योगाचे महत्व सांगणारे फलक घेऊन जागृती करण्याचा प्रयत्र केला.
पालखीतीन महभागी विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापिका काटकर व सर्व शिक्षकांनी केले. या उपक्रमासाठी श्री जैन विद्या प्रसारक मंडळ मंडळाचे मानद सचिव राजेंद्रकुमार मुथा व सहायक सचिक प्रा. अनिलकुमार कांकरिया यानी मार्गदर्शन केले.





