नेवासा: त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलातील विद्यार्थिनींनी सैनिकांना बांधली राखी

नेवासा, : नेवासा फाटा येथील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित त्रिमूर्ती शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा संकुलातील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींनी अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे केले. देशाच्या सीमेवर रात्रंदिवस कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांना बहीण भावाच्या नात्याची आठवण करून देण्यासाठी या मुलींनी अहिल्यानगर येथील एम.आय.आर.सी. सेंटरला भेट देत सैनिकांना राख्या बांधल्या.
त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलातील श्री दादासाहेब हरिभाऊ घाडगे पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, त्रिमूर्ती पब्लिक स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, त्रिमूर्ती इंटरनॅशनल स्कूलच्या सुमारे १०० विद्यार्थिनींनी या उपक्रमात सहभाग घेतला. यावेळी मुख्य सैनिकी प्रशिक्षक व माजी सैनिक परमेश्वर कसाळ, कल्पना कसाळ, सुजाता चौहाण, आशा भागवत आणि एन.सी.सी. नाईक यांनी मार्गदर्शन केले.
संस्थेच्या अध्यक्षा ॲड. सुमती घाडगे पाटील, उपाध्यक्षा ॲड. स्नेहल चव्हाण-घाडगे पाटील, सचिव मनीष घाडगे पाटील, सहसचिव डॉ. श्रुती आमले पाटील यांच्यासह प्राचार्य, शिक्षक आणि वसतिगृह प्रमुखांनी विद्यार्थिनींचे कौतुक केले. या उपक्रमाने सैनिक आणि विद्यार्थिनींमध्ये भावनिक बंध जुळले.





