Student Protests: “ना राजीनामे होणार…ना सीबीआय चौकशी” ; रांचीमधील विद्यार्थी आंदोलनांप्रकरणी JMM ची भूमिका
Student Protests: सत्ताधारी आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रवक्ते मनोज पांडे यांनी झारखंडची राजधानी रांचीमधील विद्यार्थी आंदोलनासंदर्भात एक महत्त्वपूर्ण निवेदन जारी केले आहे.

Student Protests: सत्ताधारी आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रवक्ते मनोज पांडे यांनी झारखंडची राजधानी रांचीमधील विद्यार्थी आंदोलनासंदर्भात एक महत्त्वपूर्ण निवेदन जारी केले आहे.
जेपीएससी (JPSC) आणि जेएसएससी (JSSC) प्रकरणांमधील आरोपांची केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (CBI) चौकशी करावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. मात्र या संदर्भात बोलताना जेएमएमने, “कोणतीही सीबीआय चौकशी होणार नाही त्यासोबतच कोणीही राजीनामा देणार नाही” असे म्हटले आहे.
पुढे बोलताना पांडे म्हणाले की, हेमंत सोरेन राजीनामा देणार नाहीत. यासाठी तस काही कारणच नसेल तर त्यांनी राजीनामा का द्यावा?असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.
त्यांनी सांगितले की, कोणतीही सीबीआय किंवा ईडी चौकशी होणार नाही. या यंत्रणा सत्य उघड करू शकत नाहीत. सीबीआयने संजीव मुखिया आणि व्यापम घोटाळ्याला क्लीन चिट दिली आहे. राज्य सरकार सीआयडी चौकशी करत आहे. त्यांनी सांगितले की, १४ जणांना अटक करण्यात आली आहे आणि जेपीएससीच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला आहे. त्यांची चौकशीही सुरू आहे.
जेएमएम नेत्याने म्हटले आहे की, सत्य समोर येईल. विद्यार्थ्यांना न्याय मिळेल. सरकार विद्यार्थ्यांशी संवाद साधेल आणि एक शिष्टमंडळही तयार करेल. ते म्हणाले की, भाजपच्या कार्यकाळात विविध परीक्षांमध्ये अनियमितता झाली होती, आणि तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी राजीनामा का दिला नाही? हेमंत सोरेन चौकशीही करत आहेत, परंतु सध्याच्या प्रकरणात सरकारवर थेट आरोप नाही.





