Student of the Year 3 : ‘स्टुडंट ऑफ द इयर 3′ चित्रपटाऐवजी आता वेबसीरिज बनणार; ‘या’ अभिनेत्रीची होणार एन्ट्री?
Student of the Year 3 : चित्रपटाच्या तुलनेत सीरिजची संकल्पना अगदी वेगळी असेल

Student of the Year 3 : करण जोहरच्या लोकप्रिय ‘स्टुडंट ऑफ द इयर’ फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागाची अपडेट समोर आली आहे. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, ‘स्टुडंट ऑफ द इयर 3′ चित्रपटाऐवजी वेबसीरिजमध्ये बदलण्याची निर्मात्यांची योजना आहे. सिनेमाच्या तुलनेत या सीरिजची थीम पूर्णपणे वेगळा असण्याची शक्यता आहे.
यात बॉलिवूड अभिनेत्री शनाया कपूर मुख्य भूमिकेत दिसू शकते. चित्रपटाच्या तुलनेत सीरिजची संकल्पना अगदी वेगळी असेल, ज्याचा टोन अत्यंत डार्क आणि बोल्ड असू शकतो. मात्र, या प्रोजेक्टबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
दरम्यान, २०१२ मध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, वरुण धवन आणि आलिया भट्ट यांच्यासोबत निर्माता करण जोहर यांच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ची सुरुवात झाली होती, जी बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरली. यानंतर २०१९ मध्ये याचा दुसरा भाग ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ आला, ज्यामध्ये टायगर श्रॉफ, तारा सुतारिया आणि अनन्या पांडे यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. Student of the Year 3
पण या चित्रपटाचा सिक्वल यशस्वी ठरला नाही. ‘स्टुडंट ऑफ द इयर २’च्या अपयशाचा विचार करूनच आता ‘स्टुडंट ऑफ द इयर ३’ वेब सीरिजच्या स्वरूपात सादर केली जाईल, असे मानले जात आहे.
ओटीटीवर कुठे प्रदर्शित होणार ‘स्टुडंट ऑफ द इयर ३’?
‘स्टुडंट ऑफ द इयर ३’च्या ओटीटी स्ट्रीमिंगबद्दल बोलायचे झाले तर, या शर्यतीत प्रसिद्ध ऑनलाइन प्लॅटफॉर्म ‘जिओ हॉटस्टार’चे नाव सर्वात पुढे आहे. निर्माते ही वेब सीरिज याच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करू शकतात, असे सांगितले जात आहे. Student of the Year 3
हेही वाचा:
BRICS Summit: BRICS समिटवर ट्रम्पसह जगाचे लक्ष ; भारतासाठी ‘BRICS’ एवढं महत्त्वाचे का ?






