#CWC23 #AUSvSL : ऑस्ट्रेलिया-श्रीलंका सामन्यादरम्यान वादळाचा तडाखा! स्टेडियममधील प्रेक्षक थोडक्यात बचावले, पहा Video…

ICC ODI World Cup 2023 Australia vs Sri Lanka : विश्वचषकाच्या 14व्या सामन्यात, पाच वेळचा चॅम्पियन ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका हे संघ सोमवारी (16 ऑक्टोबर) आमनेसामने आले आहेत. लखनौच्या भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर पावसामुळे व वादळामुळे सामन्यात व्यत्यय आल्याने काही काळ खेळ थांबला होता. यावेळी स्टेडियममध्ये बसलेले प्रेक्षक एका दुर्घटनेतून थोडक्यात बचावले.
Due to strong winds, hoardings are falling all over Lucknow’s Ekana Stadium.
Spectators running for safety.#CWC23 #AUSvSL #WorldCup2023 #Lucknow @BCCI @ICC pls remove these banners before the next match. pic.twitter.com/xxoqK775jK— Ali Taabish Nomani (@atnomani) October 16, 2023
वास्तविक, वादळामुळे स्टेडियममध्ये लावलेले बॅनर पडले. स्टेडियमच्या छतावर लावलेले होर्डिंग पडताना पाहून प्रेक्षक घाबरले. होर्डिंग्ज पडल्याने प्रेक्षक गॅलरीत गोंधळ उडाला. चाहते त्यांच्या जागेवरून उठले आणि पळू लागले. सुरक्षा कर्मचार्यांनी सर्वांना समजावून सांगितले आणि दुसरीकडे बसण्यास सांगितले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Ekana stadium Lucknow
Australia v. Sri Lanka pic.twitter.com/Z3ZasLsegx— Samyak Mordia (@SamyakMordia) October 16, 2023
दरम्यान, या घटनेची माहिती cricket.com.au या एका ऑस्ट्रेलियनं क्रिकेट वेबसाईटनं सुध्दा दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ऑस्ट्रेलिय- श्रीलंका सामन्यादरम्यान जोरदार वादळामुळे एकना स्टेडियमवरील काही होर्डिंग्ज पडले पण सुदैवाने यात कोणलाही इजा झालेली नाही.
Thankfully everybody appears to be ok. Strong winds have caused some re-arranging of Ekana Stadium! 💨 #CWC23 pic.twitter.com/DM6Z7Rnq7z
— cricket.com.au (@cricketcomau) October 16, 2023
श्रीलंकेचा डाव 209 धावांवर आटोपला…
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियन संघाने श्रीलंकेचा डाव 43.3 षटकांत 209 धावांत गुंडाळला आहे. श्रीलंकेच्या संघाला चांगल्या सुरुवातीचा फायदा उठवता आला नाही. कुसल परेरा आणि पथुम निसांका यांनी पहिल्या विकेटसाठी 125 धावांची भागीदारी करून श्रीलंकेला दमदार सुरुवात करून दिली. निसांका 67 चेंडूत 61 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत आठ चौकार मारले. त्यांच्यानंतर परेरा 82 चेंडूत 78 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने आपल्या खेळीत 12 चौकार मारले. हे दोघे बाद झाल्यानंतर लंकेचा संघ 209 धावांवर गडगडला. श्रीलंकेच्या 9 विकेट केवळ 84 धावांवर पडल्या.
निसांका आणि मेंडिस व्यतिरिक्त फक्त चरित अस्लंकाला दुहेरी आकडा गाठता आला. त्याने 25 धावा केल्या. दासून शनाका बाद झाल्यानंतर कर्णधार असलेल्या कुसल मेंडिसला केवळ नऊ धावा करता आल्या. पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावणारा सदीरा समरविक्रमा आठ धावांवर बाद झाला. धनंजय डी सिल्वा सात आणि लाहिरू कुमारा चार धावा करून बाद झाले. चमिका करुणारत्ने आणि दुनिथ वेललागे यांना प्रत्येकी दोनच धावा करता आल्या. महिशला तिक्षीना खाते उघडता आले नाही. तर, दिलशान मदुशंका खाते न उघडता नाबाद राहिला.
Sri Lanka bowled out for 209.
It’s our time to defend with all our might!#LankanLions #SLvAUS #CWC23 pic.twitter.com/mO36oS96Xe— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) October 16, 2023
ऑस्ट्रेलियाकडून लेगस्पिनर अॅडम झाम्पाने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. झाम्पाने 8.0 षटकात 47 धावा दिल्या. मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांना प्रत्येकी दोन यश मिळाले. स्टार्कने 10 षटकात 43 तर कमिन्स यानं 7.0 षटकात 32 धावा दिल्या. ग्लेन मॅक्सवेलने एक विकेट घेतली. त्यानं 9.3 षटकात 36 धावा दिल्या. जोश हेझलवूड यांन 7 षटकात 36 धावा दिल्या, त्याला एकही गडी बाद करता आला नाही.





