मंचर, (प्रतिनिधी) – शिंगवे गावाने आतापर्यंत मंत्री दिलीप वळसे पाटील यांना खंबीर साथ दिली आहे. तब्बल ४६ कोटीं रुपयांचा निधी गावातील विविध विकास कामासाठी मंजूर करून आणला आहे, अशी माहिती अनुसया महिला उन्नती केंद्राच्या अध्यक्षा किरणताई वळसे पाटील यांनी दिली. शिंगवे (ता. आंबेगाव) येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट व भाजपचे (महायुतीचे) अधिकृत उमेदवार दिलीप वळसे पाटील यांच्या प्रचारार्थ किरणताई वळसे पाटील यांनी वाडी वस्तीमधील मतदारांशी संवाद साधला] यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी शिंगवे गावठाण, गोरडेमळा, गाढवेमळा, जगतापमळा, टाकेमळा, येंधेमळा, कासारमळा, साकुरमळा येथील महिला युवक मतदारांची त्यांनी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी आंबेगाव तालुका महिला आघाडीच्या अध्यक्ष सुषमा शिंदे, उपाध्यक्ष संगीता वाव्हळ, ग्रामपंचायत सदस्य कविता गाढवे, सविता सैद, माया देठे, युवती अध्यक्ष अक्षदा शिंदे, लक्ष्मी तुळे, मंगल सुतार, जायदा शेख, लक्ष्मी राजगुरू, कविता बेल्हेकर, शोभा वाव्हळ, युवक अध्यक्ष स्वप्निल वाव्हळ, उपसरपंच हिरामण गोरडे, समीर वाव्हळ, निरज टाके, वैजनाथ येंधे, कविराज गाढवे, आकाश ढवळे, संकेत वाव्हळ, रमेश वाव्हळ, विश्वास सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी हिरामण गोरडे, सुषमा शिंदे, सविता सैद आदींची मनोगते झाली. सूत्रसंचालन स्वप्निल वाव्हळ यांनी केले.