कोथरूडच्या भूमीपुत्राला खंबीर पाठींबा : संजय राऊत

पुणे – शिवसेनेचा संघर्ष सुरू असताना छातीवर हात आपटून निष्ठा सांगणारे पळून गेले. तर, दुसरीकडे मला काही मिळाले नाही तरी चालेल, जे मिळाले तेच खूप आहे असा विचार करून पक्षात एकनिष्ठ राहणारे चंद्रकांत मोकाटे कोथरूडला उमेदवार लाभणे हा कोथरुडकरांचा आणि शिवसेनेचा अभिमान आहे, असे उद्गार शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोकाटे यांच्याविषयी काढले. याच एकनिष्ठेमुळे कोथरूडच्या भूमीपुत्राला गावकऱ्यांसह विविध संघटनांचा खंबीर पाठींबा मिळत आहे.
कर्वेनगर येथील भैरवनाथ मंदिरात मराठा महासभा संघटनेच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत संघटनेतर्फे चंद्रकांत मोकाटे यांना पाठिंबा देण्यात आला. यावेळी बाळासाहेब बराटे, विजय खळडकर, नंदू घाटे, कांताप्पा बराटे, संजय साळुंखे, सुनिल तोडकर, जगदीश दिघे, नामदेव राजगुरू, आनंद उर्फ बंडू तांबे, हिंदुराव पाटील उपस्थित होते. तसेच मुळशीकरांच्या स्नेहमेळाव्यात विकासासाठी चंद्रकांत मोकाटे यांना पाठींबा दर्शविला.
यावेळी महात्मा गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी, चंद्रकांत मोकाटे, विकास पासलकर, अन्वर राजन, कालिंदी गोडांबे, आरती करंजावणे, मनिषा भोसले, संगीता पवळे, विकास साबळे, अॅड. स्वप्निल तोंडे, सीताराम तोंडे, ज्योती सूर्यवंशी, ज्ञानेश्वर डफळे, उमेश कंधारे उपस्थित होते. कर्वेनगर परिवर्तन आघाडीनेही पाठिंबा जाहीर केला.
जातीभेद दूर करण्यासाठी सर्वधर्मसमभाव या तत्वाची नागरिकांमधील निर्माण होत असलेली माणुसकीची भेदभावाची दरी दूर करून राष्ट्रीय एकात्मतेचे महत्व व प्रसार करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आवाहन मराठा महासभा संघटनेचे अध्यक्ष जगजीवन काळे यांनी केले. यावेळी मोकाटे म्हणाले की, कोथरूडच्या विकासाबरोबरच आपण राष्ट्रीय एकात्मतेचा प्रसार व प्रचार करणार.





