The Paradise’ Box Office Collection : पहिल्या दिवशी दमदार ओपनिंग, दुसऱ्या दिवशी मोठी घट; नानीच्या ‘द पॅराडाईज’ची ‘इतक्या’ कोटींची कमाई
The Paradise' Box Office Collection : पहिल्या दिवसाच्या तुलनेत ही कमाई जवळपास ५० टक्क्यांनी कमी असल्याचे सांगितले जात आहे.

The Paradise’ Box Office Collection : दाक्षिणात्य सुपरस्टार नानीच्या ‘द पॅराडाईज’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाला पहिल्या दिवशी प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, दुसऱ्याच दिवशी चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कमाईत मोठी घट झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
ट्रेड वेबसाइट सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, ‘द पॅराडाईज’ने भारतात दुसऱ्या दिवशी सुमारे १४.९० कोटी रुपयांची कमाई केली. पहिल्या दिवसाच्या तुलनेत ही कमाई जवळपास ५० टक्क्यांनी कमी असल्याचे सांगितले जात आहे.
चित्रपटाचे आतापर्यंतचे देशांतर्गत बॉक्स ऑफिस कलेक्शन ६१.१५ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. प्रदर्शनापूर्वी ‘द पॅराडाईज’बाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र, सध्याची बॉक्स ऑफिस कामगिरी पाहता चित्रपटाला अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. आगामी दिवसांतील कमाईवर चित्रपटाची एकूण कामगिरी अवलंबून राहणार आहे.
काय आहे ‘द पॅराडाईज’ची कथा?
‘द पॅराडाईज’ हा चित्रपट २४ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. १९८०च्या दशकातील सिकंदराबादच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाची कथा आधारित आहे.
चित्रपटात एका झोपडपट्टीत राहणाऱ्या सावरी समाजाचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. सरकारकडून कायदेशीर मान्यता मिळवण्याच्या प्रयत्नांदरम्यान या समाजाला भेदभाव आणि सरंजामशाही शक्तींचा सामना करावा लागतो.
सामाजिक संघर्ष आणि व्यवस्थेविरोधातील लढा हा चित्रपटाच्या कथानकाचा महत्त्वाचा भाग आहे. श्रीकांत ओडेला यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. नानीसोबत मोहन बाबू, कैदू लोहड, सोनाली कुलकर्णी आणि राघव जुयाल यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.





