पिंपरी | कर्जतमध्ये शिंदेंच्या शिवसेनेत जोरदार इन्कमिंग

कर्जत, (वार्ताहर) – सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे सीमा घरत आणि लालचंद घरत यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी घरत दांपत्य आणि अशोक रसाळ, माळू शेळके यांच्या नेतृत्वात रजपे,
जामरुंग ग्रामपंचायत हद्दीतील सामाजिक क्षेत्रात सक्रीय असणाऱ्या अनेक महिलांनी शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला. या पक्षप्रवेशामुळे पाथरज जिल्हा परिषद विभागात शिवसेना पक्षाची संघटनात्मक ताकद वाढली आहे.
रजपे ग्रामपंचायत हद्दीतील रजपे, टेंभरे, टेंभरे ठाकूरवाडी, टेंभरे कातकरवाडी, शिंगढोल कातकरवाडी, रजपे पाचखडकवाडी, कातकरवाडी तर जामरुंग ग्रामपंचायत हद्दीतील जामरुंग, सोलनपाडा, लिमनेवाडी आणि डुक्करपाडा या सर्व ठिकाणांहून जवळपास तीनशेपेक्षा अधिक महिलांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला.
यावेळी जिल्हाप्रमुख संतोष भोईर, सुरेखा शितोळे, तालुकाप्रमुख रेश्मा म्हात्रे, संपर्कप्रमुख दिलीप ताम्हाणे, संघटक सुनील रसाळ, खजिनदार उत्तम शेळके, समन्वयक रमेश मते, सहसमन्वयक पंढरीनाथ पिंपरकर, मनोहर थोरवे, प्रवक्ते विलास श्रीखंडे,
पंढरीनाथ आगज, प्रसाद थोरवे, अरुण देशमुख, अभिषेक सुर्वे, मनीषा दळवी, सुनील भालिवडे, संदेश सावंत, रामचंद्र मिणमिणे, महेश घुडे, मनोज भोईर, राजेश भोईर, दर्शन दिसले, जयेश सावंत, मयूर मोरे उपस्थित होते.
राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यातील महिला भगिनींचा मान, सन्मान आणि आदर राखला जात असून महिला भगिनींना अर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे.
त्यामुळेच सामाजिक क्षेत्रात सक्रीय असणाऱ्या अनेक महिला भगिनी शिवसेना पक्षात सामील झाल्या आहेत. – महेंद्र थोरवे, आमदार, कर्जत-खालापूर





