इंडियन बॅंकेच्या नफ्यात भक्कम वाढ
Updated On:

नवी दिल्ली – पहिल्या तिमाहीत इंडियन बॅंकेचा नफा वाढून 1,182 कोटी रुपये इतका झाला आहे. गेल्या वर्षी पहिल्या तिमाहीत या बॅंकेला केवळ 369 कोटी रुपयाचा नफा झाला होता.
बॅंकेचे उत्पन्न वाढवून 11 हजार 500 कोटी रु इतके झाले आहे.
बॅंकेने जारी केलेल्या माहितीत म्हटले आहे की बॅंकेला अनुत्पादक मालमत्ता कमी करण्यात बरेच यश मिळाले आहे. बॅंकेच्या कर्मचाऱ्यांनी उत्तम कामगिरी करून अनुत्पादक मालमत्ता कमी करण्यात यश मिळविले आहे आहे. त्यामुळे बॅंकेचा चमकदार ताळेबंद जाहीर होऊ शकला. या कारणामुळे बॅंकेच्या शेअरचा भाव सोमवारी एक टक्क्यापर्यंत वाढला होता.





