Suhana Khan : घट्ट मैत्री! शुटिंमधून ब्रेक घेतल्यानंतर अनन्या-सुहाना आल्या एकत्र; VIDEO पाहा…

Suhana Khan : बॅालिवूडमधील कलाकारांची मैत्री सर्वश्रूत आहे. सलमान-शाहरूख-आमिर अशी काही त्याची उदाहण आहेत. या कलाकारांनी त्यांच्या फिल्मी करिअरला सोबतच सुरूवात केली असं म्हटलं तर वावगं वाटू नये. काही काळ लोटल्यानंतर या अभिनेत्यांना खरी प्रसिद्ध मिळाली. यांच्या मैत्रीचे गोडवे आजही गायले जातात.
आताच्या आघाडीच्या कलाकारांमध्ये अशीच घट्ट मैत्री आहे, अभिनेत्री अनन्या पांडे आणि सुहाना खान यांची. नुकताच अनन्या आणि सुहाना यांचा एकत्र आल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अनन्या “तू मेरी मैं तेरा” या सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त होती. काही काळ तिने शुटिंगपासून ब्रेक घेतला असून, अनन्या आणि सुहाना खान एकत्र फिरायला गेल्या होत्या. यावेळी सुहानाचा धाकटा भाऊ अबराम देखील त्यांच्यासोबत होता. तिघेही एका घरामधून बाहेर पडताना पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाले.
खरंतर सुहाना खान आणि अनन्या पांडे बालपणीच्या मैत्रिणी आहेत. कौटुंबिक कार्यक्रम, सुट्ट्या, पार्ट्या अशा प्रसंगी त्या एकत्र दिसतात. त्यांच्यात खूप जवळचे नाते आहे. सुहाना आणि अनन्याचा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत दोघीही अगदी सिंपल आणि कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहेत.
View this post on Instagram
पापाराझींना पाहून अनन्या हसू आवरता आलं नाही, तर अबराम त्याची बहीण सुहानासह चालत येत होता. सुहाना, अबराम, अनन्या एकत्र गाडीत बसले. पापाराझींनी या तिघांचे फोटो काढले. अभिनेत्री अनन्या पांडे ही अभिनेता कार्तिक आर्यनसोबत ‘तू मेरी मैं तेरा…’ हा सिनेमा करत आहे. नुकतीच ती या सिनेमाच्या शुटिंगसाठी जयपूर, आग्रा यांसारख्या ठिकाणी गेली होती. तर सुहाना खान तिचे वडील शाहरुख खान यांच्यासोबत ‘किंग’ हा सिनेमा करत आहे.
हेही वाचा : Election Commission : ‘गिरे तो भी टांग उपर’, आयोग नेमकं काय लपवतंय; रोहित पवारांचा सवाल





