#IPL2022 : प्लेऑफच्या ठिकाणांवरून गांगुली आणि शहा यांच्यावर जोरदार टीका

मुंबई – आयपीएल स्पर्धेचे प्लेऑफचे वेळापत्रक बीसीसीआयने जाहीर केल्यावर लगेचच त्यांच्यावर टीका सुरू झाली आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली व सचिव जय शहा यांनी हे सामने वाटून घेतले आहेत का, असा सवाल अनेकांनी विचारला आहे.
सोशल मीडियावरही या दोघांवर टीका सुरू झाली आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 29 मे रोजी अहमदाबादला होणार असून, प्लेऑफमधील क्वॉलिफायर व एलिमिनेटरचे सामने कोलकाताला होणार आहेत. देशात अन्य स्टेडियम असतानाही या दोन पदाधिकाऱ्यांनी आपल्याच राज्याच्या मैदानांना का पसंती दिली, असा सवालही काही माजी क्रिकेटपटूंनी केला आहे.
गांगुली व शहा यांच्या कार्यकाळात अहमदाबाद तसेच कोलकाता याच मैदानावर जास्तीत जास्त सामने खेळवले गेले आहेत. देशात अनेक मैदाने आहेत की तेथेही सामन्यांचे आयोजन वर्षानूवर्षे होत आहे, मग बाकी राज्यांना का डावलले जात आहे, असा सवालही चाहते करत आहेत.





