Bank Nifty: बँकिंग शेअर्समध्ये जोरदार खरेदी; बँक निफ्टी 1,060 अंकांनी उसळला
Bank Nifty: बँक ऑफ बडोदाचा शेअर सर्वात जास्त म्हणजे 4.38 टक्क्यांनी वाढला.

Bank Nifty: शेअर बाजारात सोमवारी दुपारनंतर खरेदीचे वातावरण होते. याचा लाभ बँकिंग क्षेत्राला झाला. अशा परिस्थितीत सोमवारी बँक निफ्टी 1,060 अंकानी म्हणजे 2.06 टक्क्यांनी वाढून 52,609 अंकावर बंद झाला.
आखातातील युद्ध थांबवणसाठी प्रयत्न चालू आहेत. याला काही प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे वातावरण आहे. त्यामुळे आशावादी गुंतवणूकदारांनी सोमवारी दुपारनंतर खरेदी वाढविली. इतर क्षेत्राप्रमाणे बँकिंग क्षेत्राला या खरेदीचा लाभ झाला.
बँक ऑफ बडोदाचा शेअर सर्वात जास्त म्हणजे 4.38 टक्क्यांनी वाढला. त्याचबरोबर अॅक्सिस बँक, कॅनरा बँक, एचडीएफसी बँक, पंजाब नॅशनल बँक या बँकांच्या शेअरची बरीच खरेदी झाली. आखाती युद्धामुळे इतर क्षेत्राप्रमाणेच बँकिंग क्षेत्रावरही परिणाम झालेला आहे. त्यामुळे हा निर्देशांक 52 आठवड्याच्या उच्चांकी पातळीच्या बराच खाली आहे.
दरम्यानच्या काळात रिझर्व्ह बँकेचे पतधोरण बुधवारी जाहीर होणार आहे. बँक यावेळी व्याजदरात घट किंवा वाढ करणार नाही असे वातावरण आहे. असे असतानाच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रिझव्हर्र् बँकेला अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी व्याजदर कपातीला अजूनही वाव असल्याचे वक्तव्य केले आहे. पत समितीची बैठक सुरू झाली असून देशातील आणि परदेशातील परिस्थितीचा विचार करून रिझर्व्ह बँक पत धोरण जाहीर करणार आहे.




