शेतकऱ्यांवरील बळाचा वापर थांबवा – पंधेर यांचे आवाहन

नवी दिल्ली – केंद्र सरकारने आंदोलनकारी शेतकऱ्यांवरील बळाचा वापर थांबवावा आणि सौहार्दपुर्ण वातावरण तयार करावे असे आवाहन पंजाब किसान मजदूर संघर्ष समितीचे सरचिटणीस सर्वनसिंग पंधेर यांनी सरकारला केले आहे.
आमच्या शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी एसएलआर गोळ्या, अश्रूधुराच्या गोळ्या, प्लास्टिक आणि रबराच्या गोळ्या वापरल्या. अशा प्रकारची कृती आम्हाला मान्य नाही. प्रसार माध्यमांनीही आमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न चालवला आहे असा आरोप त्यांनी केला.
आम्हाला खलिस्तानी म्हटले जात आहे. आम्हाला आम आदमी पक्षाचे व कॉंग्रेसचे हस्तक ठरवले जात आहे हे योग्य नाही असेही त्यांनी म्हटले. आम्ही सरकारशी चर्चा करणार नाही असे म्हटलेले नाही, परंतु आम्ही सरकारला विनंती करतो की हे सर्व आधी थांबवा आणि सामान्य वातावरण निर्माण करा. आम्ही कालही चर्चेसाठी तयार होतो आणि आजही तयार आहोत,” असेही त्यांनी म्हटले आहे.





