Pune District : ‘सक्ती थांबवा, अन्यथा तीव्र आंदोलन; स्मार्ट मीटरविरोधात शिरूरमध्ये मोर्चा
Pune District : यावेळी प्रवीण गायकवाड यांनी आंदोलनाची व्याप्ती अधिक वाढवण्यासाठी (दि.21) रोजी सहविचार सभेचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले.

शिरूर : स्मार्ट वीज मीटर बसविण्याच्या निर्णयाविरोधात तसेच वाढीव वीजबिलांच्या निषेधार्थ शिरूर वीज ग्राहक संघटनेच्या वतीने महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. “स्मार्ट मीटर बंदी झाली पाहिजे”, “स्मार्ट मीटर कोणासाठी, अदानी-अंबानीसाठी”, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
मोर्चाची सुरुवात शिरूर बाजार समिती परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर नागरिकांनी महावितरण कार्यालयावर मोर्चा नेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. मोर्चात वीज ग्राहक संघटनेचे प्रवीण गायकवाड, माजी नगरसेवक मंगेश खांडरे, माधव सेनेचे रवींद्र सानप, मनसेचे महिबूब सय्यद, रवींद्र लेंडे, स्वप्नील माळवे, प्रवासी संघटनेचे अनिल बांडे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी, वैशाली चव्हाण, मयूर फुलफगर, प्रवीण मुथा, बंटी जोगदंड, ललिता पोळ, छाया पटवेकरी, प्रितेश फुलडाळे, संदीप कडेकर, सुजित मैड, निलेश पाठक, निलेश कोळपकर, शैलेश जाधव, महेंद्र वारे, सुनील बाफना, भानुदास वांजुळ, रमणलाल भंडारी, प्रवीण वराळे, मृणाल बाफना, संजय ढमढेरे, अशोक सुराणा, रोहित काळे, रियाज सय्यद, राहुल शिंदे, तुषार भवाळ, दादाभाऊ लोखंडे, शेख अब्दुल हमीद, निळकंठ देवळालीकर, सुरेश शर्मा, रविंद्र कर्डिले उपस्थित होते.
यावेळी प्रवीण गायकवाड यांनी आंदोलनाची व्याप्ती अधिक वाढवण्यासाठी (दि.21) रोजी सहविचार सभेचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, महावितरणचे अधिकारी अमोल बारवकर यांनी नागरिकांशी संवाद साधताना सांगितले की, शिरूर शहरात २८ हजार वीज मीटर असून आतापर्यंत १३ हजार स्मार्ट मीटर बसविले आहेत. स्मार्ट मीटर बसविण्याचे काम महावितरणकडून नव्हे तर नियुक्त एजन्सीमार्फत केले जात आहे. नागरिकांनी स्मार्ट मीटरविरोधात दिलेले निवेदन वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येईल. स्मार्ट मीटर बसविण्याचा निर्णय हा शासनस्तरावरील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.





