Bike-Taxis : बाइक टॅक्सी बंद करा; अन्यथा आंदोलन!
Bike-Taxis : बाइक टॅक्सी सेवांमुळे निर्माण झालेल्या प्रश्नांवर चर्चा

पिंपरी – पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात विना परवाना सुरू असलेल्या बाइक टॅक्सी सेवांवर तातडीने कारवाई करून संबंधित कंपन्यांवर गुन्हे दाखल करावेत. तसेच बाइक टॅक्सी वाहने जप्त करून संबंधित ॲप बंद करण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी कष्टकरी रिक्षा-टॅक्सी चालक संघर्ष महासंघाने केली आहे.
पुढील आठ दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास पुणे व पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयांसह पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी दिला.
कष्टकरी रिक्षा-टॅक्सी चालक संघर्ष महासंघाच्या वतीने चिंचवड येथील थरमॅक्स चौकात रिक्षाचालकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत बाइक टॅक्सी सेवांमुळे निर्माण झालेल्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी निमंत्रक नाना कसबे, संघटक विशाल सरवदे, सचिन मुरगुंड, बाबासाहेब सरवदे, राजू होनमाने, दादा खांडेकर, राजू बोराडे, किशोर टोणपे, मनोज घोडके आदी उपस्थित होते.
विना परवाना बाइक टॅक्सी चालवणाऱ्या कंपन्या आणि संबंधित सेवांविरोधात कायद्यानुसार कठोर कारवाई करावी. आवश्यकतेनुसार गुन्हे दाखल करून वाहने जप्त करावीत आणि बेकायदा सेवा बंद करावी, अशी भूमिका महासंघाने मांडली.
“कायद्याचे पालन करून व्यवसाय करणाऱ्या कष्टकरी रिक्षा-टॅक्सी चालकांच्या उपजीविकेवर गदा येत असताना प्रशासनाने दुर्लक्ष करू नये. आठ दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास बेमुदत धरणे आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा काशिनाथ नखाते यांनी दिला.
Dattatray Bharane: ९७ टक्के पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण – मंत्री भरणे





