सोनू निगमच्या कॉन्सर्टदरम्यान दगडफेक? स्वत: केला खुलासा

Sonu Nigam | गायक सोनू निगमच्या कॉन्सर्टदरम्यानच्या झालेल्या गोंधळामुळे चर्चेत आला आहे. दिल्लीतील टेक्नोलॉजिकल युनिव्हर्सिटीमध्ये सोनू निगमवर दगड आणि बाटल्या फेकल्याचा प्रकार समोर आला आहे. यावर आता सोनू निगमने स्वत: स्पष्टीकरण देत दगडफेक झाली नसल्याचे सांगितले आहे.
रविवारी सोनू निगमने दिल्ली टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीच्या इंजिनिफेस्टमध्ये सादरीकरण केले. यावेळी जमावाने दगड आणि बाटल्या फेकल्या. हे पाहून सोनू निगमने कार्यक्रम थांबवला आणि प्रेक्षकांना असे वागू नका, अशी विनंती केली.
ज्यानंतर सोनू निगमने कॉन्सर्टमध्ये नेमकं काय घडलं याचा खुलासा केला. सोनू निगम लिहितो की, “मीडियाने लिहिले तसे DTU मध्ये दगडफेक आणि बॉटल फेकण्याची कोणतीही घटना घडली नाही. मंचावर कोणीतरी वेप फेकली जी शुभंकरच्या छातीला लागली. मला या घटनेविषयी सांगण्यात आलं. त्यामुळे मी शो थांबवला आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सांगितलं की, पुन्हा असं घडलं तर मला शो थांबवावा लागेल.” अशाप्रकारे सोनू निगमने यावर स्पष्टीकरण दिले आहे.
View this post on Instagram
सोनूने लोकांना शांत करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. पण जेव्हा परिस्थिती बिकट झाली तेव्हा त्याने लोकांना विनंती केली. सोनू निगम म्हणाला, ‘मी इथे तुमच्यासाठी आलो आहे, जेणेकरून आपण सर्वजण इथे चांगला वेळ घालवू शकू.’ मी तुम्हाला आनंद घेऊ नका असे सांगत नाहीये, पण हे करू नका. या घटनेत सोनूच्या टीम सदस्याला दुखापत झाली.
फेब्रुवारीमध्ये सोनू निगमचा कोलकातामधील कॉन्सर्टही चर्चेत होता. यावेळी सोनू निगम गर्दीवर ओरडताना दिसत होता, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.





