पवईत पोलिस आणि पालिका अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगडफेक; पाच ते सहा जण जखमी

Mumbai News| मुंबई उपनगरातील पवई येथील भीमनगर परिसरात गुरुवारी अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या पथकावर आणि पोलिसांवर तुफान दगडफेक करण्यात आली आहे. यात काही पाच ते सहा पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. पवईच्या जय भीम नगर येथे अतिक्रमण विरोधी कारवाई आज सकाळपासून पालिका प्रशासन आणि पोलिसांच्या उपस्थितीत करण्यात येत होती.
यापूर्वीच या ठिकाणच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या रहिवाशांना मुंबई महापालिकेकडून जागा खाली करण्याची नोटीस पाठवण्यात आली होती. मात्र पालिकेच्या नोटीसनंतरही अतिक्रमण झालेल्या जागेतील बांधकाम हटवलं न गेल्यामुळे पालिका आणि पोलिसांनी आज याठिकाणी कारवाई सुरू केली होती. Mumbai News|
परंतु पालिकेने कारवाईला सुरुवात करताच स्थानिकांनी कडाडून विरोध करत जमावाने पालिका अधिकाऱ्याच्या दिशेने दगडांचा तुफान मारा केला. येथील रहिवासी आक्रमक झाल्यानंतर तात्काळ मुंबई महापालिकेने कारवाई थांबवली. या घटनेनंतर परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. Mumbai News|
दोन महिन्यांपूर्वी या झोपडपट्टी भागात आगीची घटना घडली होती त्यानंतर दरम्यान या ठिकाणच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या रहिवाशांना मुंबई महापालिकेकडून जागा खाली करण्याची नोटीस पाठवण्यात आली होती. पालिकेने अनेकदा याठिकाणी अतिक्रमण हटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरवेळी हा प्रयत्न अयशस्वी ठरला होता. आज देखील पालिकेचे पथक पोलिसांचा मोठा फौजफाटा घेऊन अतिक्रमण पाडण्यासाठी याठिकाणी आले होते.
हेही वाचा:
तब्बल 11 वर्षानंतर ‘दुनियादारी 2’ येणार? ‘त्या’ फोटोने वाढली चाहत्यांची उत्सुकता





