राजस्थानमध्ये आत्मदहन करणाऱ्या साधूचा अखेर मृत्यू, ‘या’ कारणामुळे सुरु होत आंदोलन

राजस्थान – राजस्थानमधील भरतपूर येथे अवैध खाणकाम विरोधात आत्मदहन करणाऱ्या साधू विजय दास यांचा मृत्यू झाला आहे. स्वत:ला पेटवून घेतल्याने ते 80 टक्के भाजले होते. त्यांना पुढील उपचारासाठी दिल्लीला हलवण्यात आले होते, मात्र आज दिल्लीच्या सफदरगंज रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. 21 जुलै रोजी साधूने डीगमध्ये स्वत:ला पेटवून घेतले होते.
भरतपूर जिल्ह्यातील डीग भागात खाणबंदीच्या मागणीसाठी साधू संत गेल्या दीड वर्षांपासून आंदोलन करत होते. यादरम्यान साधू विजय दास यांनी अचानक स्वतःला पेटवून घेतले. पोलिसांनी त्यांना वाचवण्यासाठी धाव घेतली आणि जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून साधूला जयपूर आणि नंतर राजधानी दिल्लीला पाठवण्यात आले. परंतु 80 टक्के भाजल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. साधूच्या मृत्यूनंतर आता राज्यातील अशोक गेहलोत सरकारवर विरोधक अधिक आक्रमक झाले आहेत.
Rajasthan | These mines will be shifted and about 2,500 people who will be unemployed as a result, will be employed somewhere else…The state govt intends to make it (stone mining area) into a religious tourism spot: Bharatpur DC Alok Ranjan (20.7) pic.twitter.com/0HzXy9yHuR
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) July 21, 2022
कशासाठी विरोध करताहेत साधू संत ?
सुमारे दीड वर्षांपासून साधू संत अवैध खाणकामाच्या विरोधात आंदोलन करत होते. भरतपूर जिल्ह्यातील डीग भागात, कामण तहसीलचा परिसर ८४ कोस परिक्रमा मार्गात येतो. ऋषी-मुनींचा दावा आहे की हे धार्मिक श्रद्धेशी संबंधित ठिकाण आहे आणि हिंदू धर्माचे लोक येथे परिक्रमा करतात, त्यामुळे येथे कायदेशीर आणि बेकायदेशीर दोन्ही प्रकारचे उत्खनन थांबवले पाहिजे. आता राज्य सरकारने संतांच्या मागणीचा विचार करून येत्या 15 दिवसांत हा परिसर वनक्षेत्र म्हणून घोषित करण्याची अधिसूचना काढण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. येथे असलेल्या खाणी जुन्याच असल्याचे सांगितले जाते.





