Stock Market : शेअर बाजारात हाहाकार; या कारणामुळे सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांक घसरले, गुंतवणूकदारांचे कोट्यवधींचे नुकसान
Stock Market : एक व्यावसायिक दिवसापूर्वी म्हणजेच ०५ जून २०२६ रोजी 'बीएसई'वर (BSE) सूचीबद्ध असलेल्या सर्व शेअर्सचे एकूण मार्केट कॅप (बाजार भांडवल) ₹४,६१,०९,६८६.३७ कोटी होते. आज म्हणजेच ०५ जून २०२६ रोजी ते घटून ₹४,५५,०९,३४४.७२ कोटींवर आले. याचा अर्थ असा की गुंतवणूकदारांचे भांडवल ₹६,००,३४१.६५ कोटींनी कमी झाले आहे.

Stock Market : पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली तीव्र वाढ आणि जागतिक शेअर बाजारांतील मोठ्या घसरणीचा परिणाम सोमवारी भारतीय भांडवली बाजारावर दिसून आला. सलग दुसऱ्या सत्रात घसरण नोंदवत मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ७१९.०८ अंकांनी घसरून ७३,५२४.२६ वर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २४३.७० अंकांनी घसरून २३,१२३ वर स्थिरावला.
दिवसभरात सेन्सेक्सने ९२४.४० अंकांची घसरण अनुभवत ७३,३१८.९४ या नीचांकी पातळीपर्यंत पोहोचला होता. त्याचप्रमाणे निफ्टीही २९६.५५ अंकांनी घसरून २३,०७०.१५ पर्यंत खाली आला.
कोणते शेअर्स वाढले -घसरले ? (Stock Market)

Stock Market : शेअर बाजारात हाहाकार; या कारणामुळे सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांक घसरले, गुंतवणूकदारांचे कोट्यवधींचे नुकसान
सेन्सेक्समधील समभागांमध्ये इटर्नल, महिंद्रा अँड महिंद्रा, ट्रेंट, इंटरग्लोब एव्हिएशन, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) यांना सर्वाधिक फटका बसला. दुसरीकडे पॉवर ग्रिड, टेक महिंद्रा, भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि भारती एअरटेल या समभागांनी काही प्रमाणात आधार दिला.
गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ₹६ लाख कोटींची घसरण – (Stock Market)
एक व्यावसायिक दिवसापूर्वी म्हणजेच ०५ जून २०२६ रोजी ‘बीएसई’वर (BSE) सूचीबद्ध असलेल्या सर्व शेअर्सचे एकूण मार्केट कॅप (बाजार भांडवल) ₹४,६१,०९,६८६.३७ कोटी होते. आज म्हणजेच ०५ जून २०२६ रोजी ते घटून ₹४,५५,०९,३४४.७२ कोटींवर आले. याचा अर्थ असा की गुंतवणूकदारांचे भांडवल ₹६,००,३४१.६५ कोटींनी कमी झाले आहे.
क्रूड तेलाच्या किमतीत ४.१० टक्क्यांची उसळी – (Stock Market )
आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड तेलाच्या किमतीत ४.१० टक्क्यांची उसळी नोंदवली गेली असून प्रति बॅरल दर ९६.९१ अमेरिकी डॉलरवर पोहोचला. तेलाच्या वाढत्या किमतींमुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली आहे.
जागतिक बाजाराची स्थिती –
आशियाई बाजारांमध्येही मोठी पडझड झाली. दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक ८.२९ टक्क्यांनी घसरला, तर जपानचा निक्केई २२५ निर्देशांक ३.८५ टक्क्यांनी खाली आला. चीनचा शांघाय कंपोझिट आणि हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांकही घसरणीसह बंद झाले. युरोपीय बाजारही नकारात्मक क्षेत्रात व्यवहार करत होते.
यापूर्वी शुक्रवारी अमेरिकेतील बाजारांमध्ये मोठी विक्री झाली होती. नॅस्डॅक ४.१८ टक्क्यांनी, एसअँडपी ५०० निर्देशांक २.६४ टक्क्यांनी, तर डाऊ जोन्स १.३५ टक्क्यांनी घसरला होता.
तज्ज्ञांचे मत –
जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले की, पश्चिम आशियातील संघर्षामुळे जागतिक गुंतवणूकदारांचा विश्वास डळमळीत झाला आहे. कच्च्या तेलाच्या किमती १०० डॉलरच्या दिशेने वाटचाल करत असताना तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांमध्येही विक्रीचा दबाव वाढला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित तेजी टिकाऊ राहील का, याबाबत गुंतवणूकदारांमध्ये शंका निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) शुक्रवारी भारतीय बाजारातून ८,७७६.२५ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली, अशी माहिती शेअर बाजाराच्या आकडेवारीतून समोर आली.
एनरिच मनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पोनमुडी आर. यांनी सांगितले की, इस्रायल आणि इराण यांच्यातील क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे युद्धविरामानंतरही तणाव पुन्हा वाढल्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून याचाच परिणाम जागतिक बाजारांवर झाला आहे.
उल्लेखनीय म्हणजे, शुक्रवारीही सेन्सेक्स ११६.६७ अंकांनी घसरला होता, तर निफ्टीमध्ये ४९.८५ अंकांची घसरण झाली होती. त्यामुळे भारतीय बाजारातील घसरणीचा सलग दुसरा दिवस ठरला.
रुपया ५६ पैशांनी घसरला –
पश्चिम आशियातील वाढत्या भू-राजकीय तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि जागतिक बाजारातील डॉलरची मजबुती यामुळे सोमवारी रुपयावर दबाव दिसून आला. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ५६ पैशांनी घसरून ९५.७४ या पातळीवर बंद झाला.
आंतरबँक विदेशी चलन बाजारात रुपयाची सुरुवात ९५.३५ वर झाली होती. दिवसभरात तो ९५.१५ या उच्चांकावर गेला; मात्र शेवटी घसरणीसह बंद झाला. ब्रेंट क्रूडचा दर ९६.७६ डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचल्याने गुंतवणूकदारांचा कल सावध राहिला. शेअर बाजारातील मोठी घसरण आणि एफआयआयची विक्री याचाही रुपयावर परिणाम झाला.





