शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स पुन्हा 80,000 पार

Stock Market Opening| भारतीय शेअर बाजाराची आज तेजीसह सुरूवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. बीएसई सेन्सेक्स 146.83 अंकांच्या किंवा 0.18 टक्क्यांच्या वाढीसह 80,107.21 वर उघडला. त्याच वेळी NSE निफ्टी 30.45 अंकांनी किंवा 0.13 टक्यांनी वाढून 24,351.00 वर उघडला.
कोणत्या शेअर्समध्ये वाढ आणि घसरण?
बाजारातील शेअर्सच्या वाढ आणि घसरणीचे प्रमाण बघितले तर, निफ्टीमध्ये 1346 शेअर्स वाढताना दिसत आहेत तर 304 शेअर्स घसरत आहेत. सुरुवातीच्या व्यवहारात, निफ्टीमध्ये मारुती सुझुकी, ब्रिटानिया इंडस्ट्रीज, सिप्ला, आयटीसी आणि कोटक महिंद्रा बँकेचे शेअर्स वाढीसह व्यवहार करत आहेत. तर श्रीराम फायनान्स, जेएसडब्ल्यू स्टील, रिलायन्स इंडस्ट्रीज, बीपीसीएल आणि टेक महिंद्रा यांचे यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
मारुती सुझुकीच्या जोरावर ऑटो सेक्टरमध्ये तेजी दिसून येत आहे. निफ्टी बँक, आयटी, पीएसयू बँक, धातू, वित्तीय सेवा, फार्मा, एफएमसीजी, तेल आणि वायू यासह सर्व क्षेत्रांमध्ये वाढ होत आहे. रिॲल्टी निर्देशांक सुरुवातीच्या काळात तेजीच्या नोंदीवर होता जो लगेचच फ्लॅट झोनमध्ये घसरताना दिसला. Stock Market Opening|
तर दुसरीकडे, रेल्वेच्या शेअर्समध्ये वाढीचा कल कायम आहे. आजही RVNL 7.34 टक्के आणि IRFC 3 टक्क्यांच्या वाढीसह व्यापार करत आहे. रेल्वेच्या शेअर्समध्ये सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे रेल्वेच्या शेअर्समध्ये मोठी खरेदी होताना दिसत आहे. त्यामुळे एकंदरीत शेअर बाजराची आज तेजीसह सुरुवात झाल्याने काहीसा दिलासा मिळत आहे. Stock Market Opening|
हेही वाचा:
प्रसिद्ध गायिका उषा उथुप यांच्या पतीचे निधन, घरी टीव्ही पाहत असताना आला, ‘हृदयविकाराचा झटका’




