Stock Market: क्रूड महागल्याने कोसळले शेअर निर्देशांक; अमेरिका होर्मुझ सामुद्रीधूनी रोखणार असल्याचा परिणाम
Stock Market: मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 702 अंकांनी म्हणजे 0.91 टक्क्यांनी कोसळून 76,847 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 207 अंकांनी कोसळून 23, 842 अंकावर बंद झाला. शांघायचा अपवाद वगळता हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया, युरोप आणि अमेरिकेचे शेअर बाजार निर्देशांक सोमवारी कोसळले होते.

Stock Market: अमेरिका – इराण दरम्यानची युद्ध थांबविण्यासाठीची चर्चा अयशस्वी झाल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आखातातील होर्मुझ सामुद्रीधूनी रोखणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे जगातील 20 टक्के खनिज तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्यामुळे खनिज तेलाचे दर सोमवारी वाढले. त्याचा परिणाम जागतिक शेअर बाजाराबरोबरच भारतीय शेअर बाजारावर झाला.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 702 अंकांनी म्हणजे 0.91 टक्क्यांनी कोसळून 76,847 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 207 अंकांनी कोसळून 23, 842 अंकावर बंद झाला. शांघायचा अपवाद वगळता हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया, युरोप आणि अमेरिकेचे शेअर बाजार निर्देशांक सोमवारी कोसळले होते.
खनिज तेलाच्या किमती वाढल्यानंतर जगातील बहुतांश देशाच्या स्थूल अर्थव्यवस्थेवर याचा नकारात्मक परिणाम होणार आहे. महागाई वाढणार आहे. चलन बाजारातील अस्थिरता वाढणार आहे. वाहतुकीचा खर्च वाढणार आहे. अशा परिस्थितीत दूरसंचार, युटिलिटीज आणि वीज निर्मिती क्षेत्र वगळता इतर सर्व क्षेत्राच्या निर्देशांकात घट झाली. शेअर बाजारातील 2,573 कंपन्यांच्या शेअरचे भाव घसरले. 1,790 कंपन्यांच्या शेअरचे भाव वाढले. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी शुक्रवारी 772 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. मात्र आता हे गुंतवणूकदार पुन्हा विक्री करण्याची शक्यता वाढली आहे.
हेही वाचा – Edible Oil: मार्च महिन्यात भारताने 12 लाख टन खाद्यतेल केले आयात; स्वस्त होणार की महाग?
रॅलीगेअर ब्रोकिंग कंपनीचे उपाध्यक्ष अजित मिश्रा यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात शेअर बाजारात गुंतवणुकीबाबत आशादायी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र इराण- अमेरिका चर्चा फिस्कटल्यानंतर सर्व समीकरणे बदललेली आहेत. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार खरेदी टाळण्याची जास्त शक्यता आहे. दुर्देवाची बाब म्हणजे आता या प्रश्नावर नजीकच्या भविष्यात थोडक्यात शक्य दिसत नाही.
क्षेत्र घट –
मिडकॅप 0.82%
रिअॅल्टी 0.33%
सेवा 1.31%
नैसर्गिक वायू 1.25%
ग्राहक वस्तू 1.21 %
माहिती तंत्रज्ञान 1.17%





