Stock Market Holiday: महावीर जयंतीनिमित्त शेअर बाजाराला उद्या सुट्टी; एप्रिलमध्ये आणखी दोन सुट्ट्या

Stock Market Holiday – भारतीय शेअर बाजार गुरुवारी (१० एप्रिल) बंद राहणार आहे. बीएसई आणि एनएसई या प्रमुख स्टॉक एक्सचेंजना महावीर जयंतीनिमित्त सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. २०२५ च्या सुट्ट्यांच्या यादीप्रमाणे, इक्विटी, डेरिव्हेटिव्ह, करन्सी, सिक्युरिटीज लेंडिंग अँड बॉरोइंग आणि इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट्ससह सर्व सेगमेंटमध्ये व्यवहार बंद राहतील. ट्रेडिंग ११ एप्रिलपासून पुन्हा सुरू होईल.
एप्रिलमध्ये आणखी दोन सुट्ट्या –
१४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि १८ एप्रिलला गुड फ्रायडे आहे. या दोन दिवशीही बाजार बंद राहील. २०२५ च्या सुट्ट्यांमध्ये महाशिवरात्री (२६ फेब्रुवारी), होळी (१४ मार्च), रमजान ईद (३१ मार्च), महाराष्ट्र दिन (१ मे), स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट), गणेश चतुर्थी (२७ ऑगस्ट), गांधी जयंती/दसरा (२ ऑक्टोबर), दिवाळी लक्ष्मी पूजन (२१ ऑक्टोबर), दिवाळी बलिप्रतिपदा (२२ ऑक्टोबर), गुरु नानक जयंती (५ नोव्हेंबर) आणि ख्रिसमस (२५ डिसेंबर) यांचा समावेश आहे. गुंतवणूकदारांनी या सुट्ट्या लक्षात घेऊन खरेदी-विक्रीचे निर्णय घ्यावेत.
बुधवारी बाजार घसरणीसह बंद –
बुधवारी बाजार घसरणीसह बंद झाला. सेंसेक्स ३७९ अंकांनी (०.५१%) घसरून ७३,८४७ वर, तर निफ्टी १३६ अंकांनी (०.६१%) खाली २२,३९९ वर स्थिरावला. मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही विक्रीचा दबाव दिसला. निफ्टी मिडकॅप १०० निर्देशांक २५५ अंकांनी (०.५१%) घसरून ४९,५८२ वर, तर स्मॉलकॅप १०० निर्देशांक १३२ अंकांनी (०.८६%) खाली १५,२५६ वर बंद झाला. आरबीआयने रेपो रेट २५ बेसिस पॉइंटने कमी केल्याने एफएमसीजी शेअरमध्ये १.७८% वाढ झाली.





