Stock Market Holiday: रामनवमी निमित्ताने शेअर बाजाराचे शटडाऊन ; NSE, BSE ने दिली महत्वाची माहिती
Stock Market Holiday:: जर तुम्ही शेअर बाजारात दररोज व्यवहार करत असाल किंवा गुंतवणुकीची योजना आखत असाल, तर ही बातमी खूप उपयुक्त आहे.

Stock Market Holiday: जर तुम्ही शेअर बाजारात दररोज व्यवहार करत असाल किंवा गुंतवणुकीची योजना आखत असाल, तर ही बातमी खूप उपयुक्त आहे. सणासुदीच्या काळात, बाजार उघडा असतो की बंद असतो, याबद्दल अनेकदा संभ्रम निर्माण होतो. यावर्षी, रामनवमीच्या सुट्टीबद्दल गुंतवणूकदारांना अनेक प्रश्न पडले होते.
जर तुम्हालाही २६ मार्च शेअर बाजार बंद राहील की नाही, याबद्दल काहींना प्रश्न पडला असेल तर याच उत्तर आहे हो. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) यांनी आता ट्रेडिंग हॉलिडेच्या यादीद्वारे परिस्थिती स्पष्ट केली आहे.
रामनवमीनिमित्त आज बाजार बंद राहणार का? Stock Market Holiday
रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर, भारतीय शेअर बाजार आज बंद राहील. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) दोन्ही या दिवशी पूर्णपणे बंद राहतील. याचा अर्थ शेअर बाजार बंद राहील, ज्यामुळे तुम्हाला ट्रेडिंग करता येणार नाही. शेअर बाजार आता शुक्रवार, २७ मार्च रोजी त्याच्या नियमित वेळेनुसार पुन्हा सुरू होईल.
या विभागांमध्ये ट्रेडिंग नाही Stock Market Holiday

Stock Market Holiday: रामनवमी निमित्ताने शेअर बाजाराचे शटडाऊन ; NSE, BSE ने दिली महत्वाची माहिती
२६ मार्च रोजी, केवळ इक्विटीमध्येच नव्हे, तर इक्विटी डेरिव्हेटिव्ह्ज आणि सिक्युरिटीज लेंडिंग अँड बॉरोइंग (SLB) विभागांमध्येही ट्रेडिंग स्थगित केले जाईल. कमोडिटी मार्केटबाबत बोलायचे झाल्यास, NCDEX संपूर्ण दिवस बंद राहील.
आज MCX वर ट्रेडिंग होईल का? Stock Market Holiday:
कमोडिटी मार्केटमधील (MCX) गुंतवणूकदारांसाठी एक विशेष सूचना आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) आंशिक सुट्टी पाळणार आहे. सकाळी ९:०० ते सायंकाळी ५:०० पर्यंत ट्रेडिंग बंद राहील, परंतु जागतिक हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सायंकाळी ५:०० ते रात्री ११:५५ पर्यंत दुसरे सत्र सुरू राहील.





