Stock Market Highlights: सेन्सेक्स 1414 अंकांनी घसरला, निफ्टी 22150 च्या खाली बंद, 9 महिन्यांतील नीचांकी पातळी…

Stock Market Highlights: फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवसी आज 28 फेब्रुवारीला शेअर बाजार मोठ्या प्रमाणात घसरला. बाजार जवळपास 9 महिन्यांतील नीचांकी पातळीवर बंद झाला आहे. तर निफ्टीची 8 महिन्यांतील सर्वात मोठी इंट्रा-डे घसरण झाली. बीएसईच्या सर्व सेक्टर इंडेक्समध्ये विक्री दिसून आली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकात जोरदार विक्री झाली. आयटी, ऑटो, पीएसई निर्देशांक सर्वाधिक घसरले. एनर्जी, फार्मा आणि मेटल शेअर्समध्ये विक्री झाली.
व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 1414.33 अंकांच्या किंवा 1.90 टक्क्यांच्या घसरणीसह 73,198.10 वर बंद झाला. तर निफ्टी 420.35 अंकांच्या किंवा 1.86 टक्क्यांच्या घसरणीसह 22,124.70 च्या पातळीवर बंद झाला.
सेन्सेक्समधील 30 पैकी 29 समभाग घसरले तर निफ्टीच्या 50 पैकी 45 समभाग लाल रंगात बंद झाले. निफ्टी बँकेच्या 12 पैकी 10 शेअर्समध्ये घसरण झाली. रुपया 30 पैशांनी कमजोर होऊन 87.50/$ वर बंद झाला. मिडकॅप 1,222 अंकांनी घसरून 47,915 वर बंद झाला. निफ्टी बँक 399 अंकांनी घसरून 48,345 वर बंद झाला.


