Share Market : गुरुवारी सेन्सेक्स 144 अंकांनी वाढला, निफ्टी सपाट बंद

Stock Market Highlights: सुरुवातीच्या वाढीनंतर प्रॉफिट बुकींगचा दबाव दिसून आला आणि शेवटच्या तासात बाजार वरच्या स्तरावरून घसरून बंद झाला. निफ्टी दिवसाच्या उच्चांकावरून सुमारे 150 अंकांनी घसरला. आजच्या व्यवहारात, आयटी आणि फार्मा समभागांमध्ये विक्रीचा दबाव होता तर बँक निफ्टी निर्देशांकात सुमारे 1% वाढ दिसून आली.
कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी बँक, भारत इलेक्ट्रॉनिक्स, मारुती सुझुकी आणि ॲक्सिस बँक हे निफ्टीत सर्वाधिक वाढले. सिप्ला, ट्रेंट, टेक महिंद्रा, सन फार्मा आणि इन्फोसिस हे निफ्टी शेअर्सचे सर्वाधिक नुकसान झाले.
क्षेत्रीय आघाडीवर नजर टाकल्यास, आयटी निर्देशांक 1 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. तर फार्मा निर्देशांक 2 टक्क्यांनी आणि रियल्टी निर्देशांक 0.5 टक्क्यांनी घसरून बंद झाला. दरम्यान, बँक निर्देशांक 1 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. तर पॉवर इंडेक्समध्ये 0.5 टक्के आणि मेटल इंडेक्समध्ये 0.3 टक्के वाढ दिसून आली.
व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 144.31 अंकांच्या किंवा 0.18 टक्क्यांच्या वाढीसह 81,611.41 वर बंद झाला. निफ्टी 16.50 अंकांच्या किंवा 0.07 टक्क्यांच्या वाढीसह 24,998.45 वर बंद झाला.
सेन्सेक्समधील 30 समभागांची स्थिती पहा –






