Steve Witkoff : विटकॉफ पुन्हा करणार मध्यपूर्वेचा दौरा; गाझामध्ये युद्धबंदी कराराचा पाठपुरावा करणार

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ पुन्हा एकदा मध्यपूर्वेचा दौरा करणार असून इस्रायल आणि हमासमधील युद्धबंदीसाठीच्या प्रयत्नांचा ते पाठपुरावा करणार आहेत.मेरिकेच्या प्रयत्नातून गाझामध्ये युद्धबंदी घडवली जाईल, तसेच मानवतावादी मदतीच्या वितरणासाठी एक नवीन कॉरिडॉर देखील उपलब्ध करून दिला जाईल, अशी आशा अरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्तया टॅमी ब्रुस यांनी म्हटले आहे.
गाझामधील परिस्थिती सातत्याने बदलती आहे. तरिही या प्रयत्नातून काही चांगले निष्पन्न होईल अशी आपल्याला आशा वाटत असल्याचे त्या म्हणाल्या. पण या दौऱ्यात विटकऑफ कोठे जाणार आहेत आणि कोणाकोणाला भेटणार आहेत, याचा तपशील त्यांनी सांगितला नाही. हमास आणि इस्रायलच्या प्रतिनिधींमध्ये कतार येथे झालेल्या चर्चेमध्ये फारच थोडी प्रगती झाली होती. युद्धबंदीच्या कोणत्याही प्रयत्नांनंतर इस्रायलकडून गाझामध्ये नव्याने सैन्य तैनात केले जाते आहे. त्यामुळे या प्रगतीत प्रगती होऊ शकलेली नाही, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
अमेरिकेने ६० दिवसांच्या युद्धबंदीचा प्रस्ताव सुचवला आहे. या कालावधीमध्ये इस्रायलने पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करावी आणि मदतीसाठी मार्ग मोकळा करून द्यावा अशी अपेक्षा आहे. तर जोपर्यंत हमासला पूर्ण शरणागती पत्करून गाझामधून हद्दपार केले जात नाही, तोपर्यंत युद्ध सुरू राहिल, असे इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नातान्याहू यांनी म्हटले आहे.
गाझामधील परिस्थिती अधिक बिघडलेली
गाझामधील इस्रायलच्या दररोजच्या हल्ल्यांममुळे तेथील परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिकच बिघडली आहे. रविवारी देखील इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमध्ये मदत केंद्रांजवळचे ८५ पॅलेस्टिनी ठार झाले. केवळ इशाऱ्यासाठी गोळीबार केल्याचे इस्रायलच्या सैन्याने म्हटले आहे. मृतांचा आकडा वाढवून सांगितला जात असल्याचा दावाही इस्रायलने केला आहे.
मानवतावादी मदत मिळवण्यासाठी मदत केंद्रांवर गर्दी केलेल्या पॅलेस्टिनींच्या गर्दीवर इस्रायलच्या सैन्यानेच गोळीबार केल्याचे संयुक्त राष्ट्राच्या एजन्सींनी म्हटले आहे. झिकीम क्रॉसिंगजवळची ही घटना भयानक आहे. यासाठीच अमेरिका मदत वाटपासाठी क;रिडौरची निर्मिती करण्याचा पाठपुरावा करत असल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या टॅमी ब्रुस म्हणाल्या.





