Monte Carlo Title : त्सित्सिपासला ग्रीस स्पर्धेचे विजेतेपद
Updated On:

मोनॅको – ग्रीसच्या स्टेफानोस त्सित्सिपासने सलग दुसऱ्यांदा मॉंटे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. त्याने अंतिम सामन्यात स्पेनच्या अलेहान्द्रो डेव्हिडोव्हिचला 6-3, 7-6 असे दोन सरळ सेटमध्ये पराभूत केले.
मॉंटे कार्लो स्पर्धा दोन वेळा जिंकणारा त्सित्सिपास हा राफेल नदालनंतरचा पहिलाच खेळाडू ठरला. अंतिम सामन्याचा पहिला सेट त्सित्सिपासने मोठया फरकाने जिंकला, तर दुसऱ्या सेटमध्ये डेव्हिडोव्हिचने त्याला चांगली लढत दिली. मात्र, त्याने टायब्रेकरमध्ये या सेटसह सामनाही जिंकला.

