Zareen Khan : मर्यादेत राहायचं! पापाराझीच्या ‘त्या’ विचित्र मागणीवर झरीन खानचा पारा चढला, व्हिडिओ व्हायरल
Zareen Khan : तिच्या या तीव्र प्रतिक्रियेमुळे कार्यक्रमस्थळी काही वेळ शांतता पसरली होती.

Zareen Khan : बॉलिवूड अभिनेत्री झरीन खान हिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान पापाराझीने केलेल्या विचित्र मागणीवर झरीन खान हिने सर्वांसमोरच नाराजी व्यक्त करत पापाराझींना खडेबोल सुनावले.
सोमवारी मुंबईत एका कपड्यांच्या ब्रँडच्या लॉन्च कार्यक्रमाला झरीन खान हिने हजेरी लावली होती. यावेळी ती डेनिम जंपसूट, जॅकेट आणि ड्रेसमध्ये पापाराझींसाठी पोझ देत होती. त्याचवेळी एका फोटोग्राफरने, “हा ड्रेस घालून दाखवा,” अशी विचित्र मागणी केली.
ही मागणी ऐकताच झरीनने, “तुमच्या सगळ्यांसमोर?” असा सवाल केला. त्यावर पापाराझींनी “हो” असे उत्तर दिल्यानंतर झरीनचा पाराच चढला. तिने “हे चालणार नाही,” अशा स्पष्ट शब्दांत पापाराझींना खडेबोल सुनावले. (Zareen Khan)
View this post on Instagram
हेही वाचा : West Bengal Politics: ‘दोन दिवस उलटले, पण आत्तापर्यंत…’ ; ममता बॅनर्जींचे निवडणूक आयोगाला पत्र
यावरच न थांबता झरीन म्हणाली, “माझ्याशी मूर्खपणाचे बोलू नका. मी अशा गोष्टी अजिबात खपवून घेणार नाही. प्रत्येकाने आपल्या मर्यादेत राहावे.” तिच्या या तीव्र प्रतिक्रियेमुळे कार्यक्रमस्थळी काही वेळ शांतता पसरली होती.
झरीनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी तिच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. “झरीनने योग्य उत्तर दिलं,” “पापाराझींनी मर्यादा पाळायला हव्यात,” अशा प्रतिक्रिया देत अनेकांनी तिच्या स्पष्टवक्तेपणाचं कौतुक केलं. (Zareen Khan)
दरम्यान, झरीन खानने २०१० मध्ये सलमान खानसोबत ‘वीर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ‘हाऊसफुल २’, ‘हेट स्टोरी ३’, ‘अक्सर २’, ‘१९२१’ आणि पंजाबी चित्रपट ‘जट जेम्स बाँड’ यांसारख्या चित्रपटांत तिने काम केले. झरीन गेल्या काही वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर असून, २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हम भी अकेले, तुम भी अकेले’ या चित्रपटात ती शेवटची झळकली होती.





