लॉकडाऊन दरम्यान घरातील ‘ही’ कामे करुन राहा ‘स्लिम’ आणि ‘फिट’ !
Updated On:

मुंबई – कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वच नागरिक आपल्या घरात असून, वर्क फ्रॉम होम आणि घरातील इतर कामे करताना दिसत आहेत.
दरम्यान, या काळात तुम्हाला वजन वाढलेले जाणवते अशा वेळेस वजन कमी करण्यासाठी महागडे उपाय करण्यापेक्षा काही बिनखर्चाचे आणि सोपे घरगुती उपाय जास्त प्रभावी ठरू शकतात. घरातील काही खास कामे करुन तुम्ही वजन वेगाने कमी करू शकता. या कामांमुळे कॅलरीज वेगाने बर्न होतात, आणि वजन कमी होते. घरातील ही कामे कोणती आणि त्यामुळे किती कॅलरीज बर्न होतात, ते जाणून घेवूयात. ही कामे करा
- पीठ मळण्याचा फायदा म्हणजे याच्या मदतीने कॅलरी बर्न करु शकता.
- ऑटोमॅटिक मशीनपेक्षा तुम्ही हातांनी कपडे धुतल्यास फिटनेसचे अनेक फायदे होतात.
- उभे राहून असो वा बसून भांडी घासल्याने सुमारे 125 कॅलरीज बर्न होतात.
- स्वत: जेवण तयार केल्यास भरपूर कॅलरीज बर्न होऊ शकतात.
टॅग्स:










