State Public Service Commission : राज्य लोकसेवा आयोगांची पुनर्रचना करा; ‘या’ भाजप खासदाराची मागणी
देशभरातील राज्य लोकसेवा आयोगांची (State Public Service Commission) साफसफाई आणि पुनर्रचना करण्याची वेळ आता आली आहे, असे प्रतिपादन भाजपचे राज्यसभा सदस्य लहर सिंग सिरोया यांनी केले.

State Public Service Commission : देशभरातील राज्य लोकसेवा आयोगांची (State Public Service Commission) साफसफाई आणि पुनर्रचना करण्याची वेळ आता आली आहे, असे प्रतिपादन भाजपचे राज्यसभा सदस्य लहर सिंग सिरोया यांनी केले.
देशाच्या विविध भागांत विद्यार्थ्यांकडून होणारी आंदोलने (State Public Service Commission) ही एका गंभीर समस्येचे लक्षण आहेत आणि राज्य लोकसेवा आयोग या समस्येत मोठी भर घालतात, असे त्यांनी नमूद केले. विश्वासार्हतेचे संकट दूर करण्यासाठी राज्यांनी केंद्रासोबत मिळून एखादे धोरण किंवा कायदेशीर उपाययोजना तयार केली पाहिजे, असे ते म्हणाले.
राज्य लोकसेवा आयोगांमधील राजकीय हस्तक्षेप हे एक उघड गुपित असल्याचे त्यांनी सांगितले. यात एक ठराविक नमुना दिसून येतो. जेव्हा दबाव असतो, तेव्हा सरकारे सुधारणांसाठी समित्या नेमतात; पण जेव्हा दबाव ओसरतो, तेव्हा तीच सरकारे पुन्हा संशयास्पद चारित्र्य आणि खराब सार्वजनिक प्रतिमा असलेल्या व्यक्तींची आयोगांवर नियुक्ती करण्याच्या जुन्या पद्धतीचा अवलंब करतात.
काही वर्षांतच कर्नाटकातही अशीच परिस्थिती पाहायला मिळाली होती. भ्रष्टाचाराचे हे दुष्टचक्र तोडण्यासाठी आवश्यक असलेल्या राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे. हे आयोग (State Public Service Commission) आता जातीय राजकारणाचे अड्डे बनले आहेत, असे सिरोया म्हणाले.






