राज्यस्तरीय ध्येय लेडी आयडॉल पुरस्कार सौ.संगिता सुकाळकर यांना प्रदान

नेवासा (प्रतिनिधी) – युवा ध्येय ग्रुप अहमदनगरच्या वतीने शैक्षणिक कार्याकरीता दिला जाणारा “राज्यस्तरीय ध्येय लेडी आयडॉल पुरस्कार २०२४” नेवासा येथील सौ.संगीता संजय सुकाळकर यांना नुकताच ज्येष्ठ ग्रामीण कथाकार बबन पोतदार यांच्या अहमदनगर व आकाशवाणीचे केंद्रप्रमुख राजेंद्र दासरी,उद्योजक नितीन एडके,ध्येय उद्योग समुहाचे प्रमुख लहानु सदगीर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
सौ.संगीता सुकाळकर यांनी अहमदनगर येथे ग्रामीण भागातून आलेल्या गरजू विद्यार्थी मुला मुलींना दिलेल्या शैक्षणिक योगदानाबद्दल ध्येय लेडी आयडॉल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.ध्येय उद्योग समुहाच्या वतीने दरवर्षी वर्धापन दिनानिमित्त विविध पुरस्कार देण्यात येतात. समाज जीवनात निरपेक्ष चांगुलपणाच्या भावनेने..संवेदनशील मनाने..जाणीवपूर्वक कार्यरत राहिल्यास..समाज त्याची दखल घेतो…त्याची फलश्रुती म्हणजे.. शैक्षणिक कार्याकरीता दिला जाणारा अहमदनगर ध्येय ग्रुपचा….”राज्यस्तरीय ध्येय लेडी आयडॉल पुरस्कार २०२४” हा होय.
गेली १० ते १२ वर्षे अहमदनगर येथे असताना ग्रामीण भागातून अकरावी बारावी वर्गातील विविध स्पर्धा परीक्षा त्यांच्या अभ्यासाकरिता आलेल्या गरजू विद्यार्थी मुलामुलींना लागेल ती मदत त्यांच्या डब्ब्यांची सोय,रूम बघून देणे,आजारपण आर्थिक मदत ते अभ्यासचं करतात का?? त्यांची संगत?? त्यांच्या पालकांच्या भूमिकेतून जाणीवपूर्वक लक्ष्य देणे व त्यांच्या पालकांच्या संपर्कात रहाणे हया सर्व भूमिका सौ संगिता सुकाळकर यांनी पार पाडल्या होत्या. याची दखल घेत मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.





