शेतकऱ्यांना मोठा दिलासा…! अतिवृष्टीग्रस्तांसाठी राज्य सरकारच मोठं पाऊल
Updated On:

मुंबई : अतिवृष्टी व पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी नुकसानीपोटी ६८९ कोटी ५२ लाख ६१ हजार रुपयांच्या निधीस मान्यता दिली आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली.
नांदेड, परभणी, सातारा आणि सांगली जिल्ह्यांतील लाखो शेतकऱ्यांच्या शेतात पिके पाण्याखाली गेल्याने उद्ध्वस्त झाली आहेत. नांदेड जिल्ह्यास सर्वाधिक निधी तर परभणी, सातारा आणि सांगलीलाही मोठा दिलासा मिळणार आहे. ही मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असून, ती कर्जवसुलीत वळवू नये, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
टॅग्स:





