“राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, पंचनामे झाल्यानंतर भरपाई देणार”; कृषिमंत्री भरणेंची ग्वाही

Dattatray Bharane | राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही ठिकाणी जनावरे वाहून गेल्याच्या देखील घटना घडली आहे. अनेक भागात झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बुधवारी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेल्या नुकसानाची पाहणी केली. यानंतर त्यांनी वाशिममध्ये प्रसारमाध्यमासोबत संवाद साधला. यावेळी भरणे यांनी राज्यात 20 लाख 12 हजार एकर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती दिली.
राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी – दत्तात्रय भरणे
अनेक भागात अतिवृष्टी झाली असल्याने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून या नुकसानीचे पंचनामे सुरू असून अहवाल मिळाल्यानंतर तात्काळ शेतकऱ्यांना मदत दिली जाईल. राज्यातील तब्बल १९ जिल्ह्यांमधील १८७ तालुके आणि ६५४ महसूल मंडळांमध्ये मुसळधार पाऊस झाला असून मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे नुकसान झाले आहे. याकाळात राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार, 8 लाख 5 हजार 110 हेक्टर म्हणजे तब्बल 20 लाख 12 हजार 775 एकर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये 10 हजार हेक्टरपेक्षा जास्त नुकसानग्रस्त क्षेत्र असलेले 11 जिल्हे समोर आले आहेत.
राज्यात सर्वाधिक 7 लाख 13 हजार 857 एकर क्षेत्राचे नुकसान नांदेड जिल्ह्यात झाला असून आहे. तर वाशिम जिल्ह्यात 4 लाख 11 हजार 392 एकर क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचार केल्यास सर्वाधिक नुकसान वाशिम जिल्ह्यात असल्याचही भरणे यांनी सांगितले. Dattatray Bharane |
सर्वाधिक नुकसानग्रस्त जिल्हे –
गेल्या तीन दिवसापासून राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका नांदेड व वाशिम जिल्ह्याला बसला आहे. त्यानुसार नांदेडमध्ये 285543, बुलढाणा 74405, वाशिम 164557, सोलापूर 41472, यवतमाळ 80969, अकोला 43703 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे सर्वाधिक नुकसान सोयाबीन, मका, कापूस, उडीद, मूग या पिकांचे झाले आहे. तर काही ठिकाणी भाजीपाला, फळपिके, ऊस, कांदा, बाजरी, ज्वारी आणि हळद या पिकांनाही मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. Dattatray Bharane |
हेही वाचा:
Pune News | पंचनामे झाल्यावरच मदत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस





