Rohit Pawar : राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरण: ईडीच्या आरोपत्रात रोहित पवारांचं नाव; एक्सवरून पोस्ट म्हणाले…

Rohit Pawar : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी एक मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणात ईडीने न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचं नाव या आरोपत्रात नमूद करण्यात आले आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी आमदार रोहित पवार यांच्या मालकीच्या असणाऱ्या बारामती अॅग्रो कंपनीवर ईडीने कारवाई केली होती. या कारवाईत या कंपनीच्या ५० कोटीहून अधिक किंमतीच्या मालमत्तेवर ईडीने जप्तीची कारवाई केली होती. त्यानंतर आता त्यांच नाव ईडीच्या आरोपपत्रात समाविष्ठ करण्यात आले आहे. ईडीने या प्रकरणात रोहित पवार यांच्यावर गैरव्यवहारातून आर्थिक लाभ घेतल्याचा ठपका ठेवला आहे.
आता ईडीच्या आरोपपत्रात नाव समाविष्ट करण्यात आल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी याविषयी आपली प्रतक्रिया दिली आहे. कुणाचं आणि ऐकलं नाही म्हणून माझ्याविरोधात ईडीने कारवाई केली हे जगजाहीर असल्याचे रोहित पवार म्हणाले आहेत. तसेच न्यायदेवतेवर माझा पूर्व विश्वास असून विचाराांसाठी कितीही संघर्ष करावा लागला तरी माझी तयार असल्याची एक्स पोस्ट त्यांनी शेअर केली आहे.
ईडीच्या आरोपांनुसार, सहकारी बँकेच्या आर्थिक गैरव्यवहारात बारामती अॅग्रोचा थेट सहभाग असल्याचा संशय आहे. रोहित पवार यांच्यावर गैरव्यवहारातून आर्थिक लाभ घेतल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
कुणाचं आणि काय ऐकलं नाही म्हणून माझ्याविरोधात #ED ने कारवाई केली हे जगजाहीर आहे, याबाबत अधिक सांगण्याची गरज नाही. #ED चे अधिकारी बिचारे आदेशाचे धनी, त्यांनी केवळ आलेल्या आदेशाचं पालन केलं आणि आता आरोपपत्रही दाखल केलं. म्हणजेच तपास पूर्ण झाला असून ज्याची आपण वाट बघत होतो त्या… pic.twitter.com/J7zdxNtWS2
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 12, 2025
रोहित पवारांची एक्सवरील पोस्ट
कुणाचं आणि काय ऐकलं नाही म्हणून माझ्याविरोधात #ED ने कारवाई केली हे जगजाहीर आहे, याबाबत अधिक सांगण्याची गरज नाही. #EDचे अधिकारी बिचारे आदेशाचे धनी, त्यांनी केवळ आलेल्या आदेशाचं पालन केलं आणि आता आरोपपत्रही दाखल केलं. म्हणजेच तपास पूर्ण झाला असून ज्याची आपण वाट बघत होतो त्या निर्णयाचा चेंडू आता न्यायव्यवस्थेच्या कोर्टात आहे. कारण न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास असून यामध्ये ‘दूध दूध आणि पाणी का पाणी’ होईलच…! विचारांसाठी कितीही संघर्ष करावा लागला तरी माझी तयारी आहे… महाराष्ट्राने लाचारीला आणि फितुरीला कधीही थारा दिला नाही आणि संघर्षालाच डोक्यावर घेतलंय, हा इतिहास आहे!
हेही वाचा : “कमाल वाटते, बॅगमध्ये चक्क पैसे दिसत असताना…”; अंजली दमानियांनी थेट फोटो शेअर करत दिलं शिरसाटांना ओपन चॅलेंज





