शेतकऱ्याची यशोगाथा! युट्यूबवर व्हिडीओ पाहून सुरु केला ‘खेकडा पालन’ व्यवसाय; एक गुंठा जागेत वर्षाला 6 लाख रुपये उत्पन्न

Updated On:
शेतकऱ्याची यशोगाथा! युट्यूबवर व्हिडीओ पाहून सुरु केला ‘खेकडा पालन’ व्यवसाय; एक गुंठा जागेत वर्षाला 6 लाख रुपये उत्पन्न

हिंगोली (शिवशंकर निरगुडे) – आपण आज एका विचित्र समजल्या जाणाऱ्या प्राण्याची माहिती पाहणार आहोत तो म्हणजे खेकडा पालन अर्थात त्याला इंग्रजीत क्रॅब (crab) असे म्हणतात. शाकाहारी लोकांसाठी हा एक विचित्र प्राणी असला तरी मांसाहारी खास करून मासे प्रेमींसाठी खेकडा ही एक मेजवानी असते. चला तर जाणून घेऊयात हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची यशोगाथा..

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील बाभूळगाव येथील शेतकऱ्यांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हनून खेकडा पालन व्यवसाय चालु केला आहे. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील बाभुळगाव येथील शेतकरी भारत जहरव यांनी स्वता:च्या शेतात 20 बाय 50 आणि आठ फूट खोल शेततळे तयार करून त्यात खेकडा पालन व्यवसाय सुरू केला आहे. आता या शेततळ्यात 2 क्विंटल खेकड्याचे नर व मादी रोपे आणून सोडले आहेत. या सर्व खेकडापालन व्यवसाय बद्दल सर्व माहिती त्यांनी youtube वरून घेतली आहे.

youtube वरून खेकडा पालनाची माहिती घेत हिंगोली जिल्ह्यातील बाभूळगाव येथील शेतकरी भारत जहरव यांनी स्वतःच्या शेतामध्ये वीस बाय पन्नास आणि आठ फूट खोल शेत तळे केलं. त्यात खेकडे पालन सुरू केलं. यावर्षी त्यांना सहा लाख रुपये उत्पादन मिळाले आहे. डोंगराळ भागातील पाच एकर शेतीचे मालक असलेले भारत जहरव यांनी ही कमाल केली आहे. यूट्यूबवर भरत यांनी खेकडा पालनाचा व्हिडीओ पहिला आणि पाहताच क्षणी हा उपक्रम आपणही राबवायचा ठरवले.

स्वतःच्या शेतात 20 बाय 50 फूट आणि 8 फूट खोल असे शेततळे खोदून शेत तळ्याचे काँक्रिटच्या माध्यमातून बांधकाम करण्यात आले. बांधकाम करण्यात आलेल्या शेततळ्यात काही प्रमाणात माती टाकली, त्यानंतर बीज रुपात 2 क्विंटल खेकडे या शेततळ्यात सोडण्यात आले. एक वर्ष हे खेकडे जोपासण्यात आले.

वर्षाला घेतोय 6 लाखांचे उत्पन्न –

खेकड्यांना जोपासण्यासाठी गुंतवणुकी व्यतिरिक्त कोणताही खर्च नाही. चिकन आणि मासे यातील वेस्टेज या खेकड्यांना खायला दिले जाते. दर आठ दिवसाला शेत तळ्यातील पाणी बदलून काळजी घेतली जाते. फक्त 9 महिन्यात विक्रीलायक खेकडे तयार झाले आहेत. जवळपास 12 क्विंटलहून अधिक खेकडे या शेत तळ्यात विक्रीसाठी तयार आहेत. खेकड्याला आयुर्वेदिक महत्त्व मोठे असल्याने मागणी जास्त असते. 500 रुपये किलोप्रमाणे ह्या खेकड्याची विक्री होत आहे. आतापर्यंत त्यांना खेकडा पालन उभारणी साठी जवळपास 4 लाख रुपये खर्च झाला आहे. यातून फक्त 9 महिन्यात 6 लाख रुपयांचे उत्पन्न झाले. अजुन देखील उत्पादनाद वाढ होईल अशी आशा भारत जहरव यांना आहे.

अनेकदा शेतकरी शेती, कुक्कुटपालन, पशुपालन किंवा मत्स्यपालन करून आपला उदरनिर्वाह करतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का की या सर्वांशिवाय शेतकरी खेकड्याची शेती करून चांगला नफा मिळवू शकतात. हे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी करून दाखवले आहे. खेकडा हा एक समुद्री खाद्यपदार्थ आहे. केवळ भारतातच नाही तर जगातील अनेक देशांतील लोक ते अगदी आवडीने खातात.

टॅग्स:

आणखी संबंधित बातम्या

Hingoli: घोरदरीच्या शेतकऱ्याच्या मुलांची भरारी; ज्ञानेश्वर पायघन व अमोल पवार यांची PSI पदी निवड

2026-05-02 19:13:33

Hingoli: घोरदरीच्या शेतकऱ्याच्या मुलांची भरारी; ज्ञानेश्वर पायघन व अमोल पवार यांची PSI पदी निवड

Former MLA Baliram Patil Kotkar: हिंगोलीचे माजी आमदार बळीराम पाटील कोटकर यांचे निधन; पोलीस पाटील ते आमदार...थक्क करणारा प्रवास

2026-04-23 21:37:16

Former MLA Baliram Patil Kotkar: हिंगोलीचे माजी आमदार बळीराम पाटील कोटकर यांचे निधन; पोलीस पाटील ते आमदार...थक्क करणारा प्रवास

Hingoli: दुष्काळाच्या झळांनी ‘पानकनेरगाव’ची ओळख पुसली; 400 पानमळ्यांचा इतिहास काळाच्या पडद्याआड

2026-04-20 16:53:56

Hingoli: दुष्काळाच्या झळांनी ‘पानकनेरगाव’ची ओळख पुसली; 400 पानमळ्यांचा इतिहास काळाच्या पडद्याआड

Hingoli Farmer Suicide: हिंगोलीत शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या; पोलिसांच्या तगाद्यामुळे टोकाचे पाऊल उचलल्याचा नातेवाईकांचा आरोप

2026-04-16 19:13:48

Hingoli Farmer Suicide: हिंगोलीत शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या; पोलिसांच्या तगाद्यामुळे टोकाचे पाऊल उचलल्याचा नातेवाईकांचा आरोप

Hingoli: पानकनेरगावात वाईन बार चालकांचा धुमाकूळ; बाईकवरून दारूची 'होम डिलिव्हरी' सुरू

2026-04-01 19:31:14

Hingoli: पानकनेरगावात वाईन बार चालकांचा धुमाकूळ; बाईकवरून दारूची 'होम डिलिव्हरी' सुरू