नगर – आष्टी-नगर-मुंबई अशी रेल्वे शटल एक्स्प्रेस सुरु करा

नगर – नगर- बीड परळी उस्मानाबाद सह मराठवाड्याचे भाग्य उजळविण्यासाठी आपल्या मंत्रालयाने आष्टी नगर रेल्वे सुरु केली. मात्र या रेल्वेला मिळालेला अत्यल्प प्रतिसाद पाहता या रेल्वेचा फ्लॉप शो झाला आहे. त्यामुळे ही रेल्वे आष्टी ते नगर ते दौंड कॉडलाईन ते पुणे आणि पुढे मुंबई सुरु करावी अशी मागणी, केंद्रीय रेल्वे मंत्री तसेच खासदार नीलेश लंके यांना युवासेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड दिले आहे.
नगर -आष्टी रेल्वेला प्रवाशांचा अतिशय अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. तरीदेखील या फ्लॉप शो चा रिपीट टेलिकास्ट करण्याचा घाट रेल्वे खाते का घालत आहे. ही रेल्वे चालविण्यासाठी दररोज ८० हजार रुपयांचे डिझेल लागते पण तिकिटे फक्त १०० ते १५० विकली जातात.
ही रेल्वे जर आष्टी नगर-दौंड-पुणे-मुंबई अशी सुरु झाली आणि ती जर सायंकाळी आष्टीहून निघाली आणि पहाटे मुंबईत पोहोचली तर त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल. आज हजारो विद्यार्थी आणि कामगार यांना दररोज जास्त वेळ, पैसा आणि परिश्रम खर्च करून रस्ते मार्गाने पुणे-मुंबईला जावे लागते. ही रेल्वे सुरु झाल्यास वेळ आणि पैसा वाचेल असे ही त्यांनी म्हटले आहे. तसेच बीड,आष्टी जामखेड आणि नगरहून पुण्याला दिवसाला लाखाहून अधिक लोक ये-जा करीत असतात.नगर पुणे रोडवरील सुपा टोल नाक्यावर याची नोंद आहे. तसेच नगर पुणे मार्गावर दररोज २ हजार पेक्षा जास्त एस टी आणि खाजगी ट्रॅव्हल्स ची वाहतूक होते. त्यामुळे आष्टी नगर-दौंड क्वाडलाईन-पुणे-मुंबई अशी थेट रेल्वे सुरू झाल्यास सर्वांची सोय तर होईल.





