कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा : गडाख

नेवासा – माजी खासदार कै. तुकाराम पाटील गडाख यांच्यावर प्रेम आणि श्रद्धा ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांना गडाख परिवार कधीही अंतर देणार नाही. कार्यकर्त्यांच्या सुख- दुःखात सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, अशी ग्वाही रविराज गडाख यांनी दिली.
नेवासा येथील आदर्श विद्या मंदिर प्रागंणात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी तुकाराम पाटील गडाख मित्र मंडळाचे कार्यकर्त्यांसह किसनराव पाटील गडाख (पेशवे अण्णा), सुरेशराव गडाख, ऋतुराज गडाख, बाजार समितीचे माजी सभापती शंकरराव लोखंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य तुकाराम शेंडे, सरपंच देविदास साळुंखे, बी.डी.मोटे, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेवासा तालुकाप्रमुख सुरेश डिके, शहरप्रमुख बाबा कांगुणे, भाजपचे ज्ञानेश्वर पेचे, प्रताप चिंधे, चेअरमन गणपतराव सोनवणे, खेडल्याचे सरपंच अशोक केदारी, सोमनाथ शेंडे, महेंद्र गुंदेचा, सुनिल बानकर, प्रमोद कुमावत आदी उपस्थित होते.
शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र भोस यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. शंकरराव लोखंडे, सुरेश डिके, महिला आघाडी तालुकाप्रमुख मिरा गुंजाळ, शहरप्रमुख बाबा कांगुणे, पप्पू देशमुख, रामहरी थोरात, प्रकाश वाकचौरे, शामशेठ मेहेर, जगनाथ भगत यांच्यासह तालुक्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
कै. तुकाराम पाटील गडाख यांच्या निधनाने कार्यकर्त्यांवर दुखाचा डोंगर उभा राहिलेला आहे. मात्र, आम्ही निष्ठावान कार्यकर्त्यांसाठी निम्या रात्री धावून येवू? त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी चिंता करू नये, कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात आम्ही सदैव पाठीशी उभे राहू, अशी ग्वाही किसनराव गडाख यांनी यावेळी दिली.





