jagannath puri| उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे सत्संगादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. तर अनेक लोक जखमी झाले. एकीकडे ही घटना ताजी असतानाच ओडीशा येथील जगन्नाथ रथ यात्रेदरम्यानही रविवारी चेंगराचेंगरी झाली आहे. यात अनेक भाविक जखमी झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुरी येथील बडा डांडा परिसरात घडलेल्या या घटनेत एका भाविकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात जीव गमावलेला भाविक परराज्यातील असल्याचे म्हंटले जात आहे. दरम्यान, या रथयात्रेसाठी देशभरातून लाखो भाविक येत असतात. यंदाही रथयात्रेला लाखो भाविकांनी गर्दी केली होती. परंतु सायंकाळी गर्दी प्रशासनाच्या नियंत्रणाबाहेर गेली होती. परिणामी चेंगराचेंगरी होऊन शेकडो भाविक जखमी झाले आहेत. श्री बलभद्र यांचा रथ ओढत असताना ही दुर्घटना घडली आहे. jagannath puri| बलभद्र यांचा रथ ओढण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली असता तिथे एकच गोंधळ उडाला. त्यानंतर धक्काबुक्की सुरू झाली आणि याचे रुपांतर चेंगराचेंगरीत रुपांतर झाले. यात एका भाविकाचा मृत्यू झाला. दरम्यान, तब्बल 53 वर्षांनंतर पुरीमध्ये भगवान जगन्नाथांची रथयात्रा दोन दिवस चालणार आहे. 1971 पासून ही रथयात्रा एक दिवस चालत होती. परंतु या वर्षी ही रथयात्रा दोन दिवस चालणार आहे. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन माझी यांनी देखील रथांचे दर्शन घेतले होते. jagannath puri| हेही वाचा: Team India : चॅम्पियन्स ट्रॉफी, WTC फायनलमध्ये कोण असणार भारताचा कर्णधार? BCCIचे सचिव जय शहांनी केली मोठी घोषणा…