बाप्पा पावलो! कोकणातील गणेशोत्सवासाठी पुणे, पिंपरीतूनही एसटी धावणार
Updated On:

पुणे – कोकणात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होतो. नोकरी, व्यवसायासाठी पुणे, मुंबईसारख्या शहरांमध्ये राहणारे कोकणवासीय देखील गणेशोत्सवासाठी गावी जातात. मात्र, यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर गावी जाता येईल का, याबाबत कोकणवासीयांना साशंकता होती.
मात्र, मंगळवारी राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार, कोकणवासीयांसाठी एसटीच्या पुणे विभागातून देखील स्वारगेट आणि पिंपरी-चिंचवड आगारांतून गाड्या सोडण्यात येणार आहेत. रत्नागिरी, चिपळूण, खेड, गुहागर, महाड, दापोली, मंडणगड या ठिकाणांसाठी बसेस सोडण्यात येणार आहेत. मात्र, यासाठी आरक्षण (रिझर्व्हेशन) करणे आवश्यक आहे.





