St. Vincent Junior League : हॉकीमध्ये लॉयला हायस्कूलला विजेतेपद…

पुणे – सेंट व्हिन्सेंट हायस्कूल व ज्युनियर कॉलेज यांच्यातर्फे आयोजित सेंट व्हिन्सेंट ज्युनियर लीग स्पर्धेत हॉकी लीगमध्ये लॉयला हायस्कुल संघाने १५ गुणांसह अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले. सेंट व्हिन्सेंट हायस्कूलच्या फुटबॉल, हॉकी व बास्केटबॉल मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत हॉकी लीग स्पर्धेत अखेरच्या साखळी फेरीत लॉयला हायस्कुल संघाने सेंट पॅट्रिक्स हायस्कूल अ संघाचा ६-३ असा पराभव केला.
विजयी संघाकडून स्कायलर राजने (२,४,१०,१५ मि.) चार गोल, मार्क डेझने (१२,१८ मि.) दोन गोल केले. लॉयला हायस्कुल संघाने ५ सामन्यात ५ विजय, १५ गुणांसह अव्वल क्रमांक पटकावला. दुसऱ्या सामन्यात शौर्य मेंगेने (३,४,६,२० मि.) केलेल्या चार गोलांच्या जोरावर सेंट पॅट्रिक्स हायस्कूल अ संघाने सेंट पॅट्रिक्स हायस्कूल ब संघाचा ८-० असा पराभव केला. सेंट पॅट्रिक्स हायस्कूल अ संघाने ५ सामन्यात ४ विजय, १ पराभव, १२ गुणांसह दुसरा क्रमांक पटकवला.
IND vs ENG : आर. अश्विनने रचला इतिहास, ‘विशाखापट्टणम’मध्ये मोडला 45 वर्षे जुना विक्रम…
अन्य लढतीत आर्यन सावंतने (१० मि.) नोंदवलेल्या एकमेव गोलाच्या जोरावर सेंट व्हिन्सेंट हायस्कूल संघाने सेंट पॅट्रिक्स हायस्कूल ब संघाचा १-० असा पराभव केला. सेंट व्हिन्सेंट हायस्कूल संघाने ५ सामन्यात ३ विजय, २ पराभव, ९ गुणांसह तिसरा क्रमांक पटकावला. स्पर्धेचे पारितोषिक वितरण हॉकी महाराष्ट्रचे वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज भोरे, सेंट व्हिन्सेंट हायस्कूलचे प्राचार्य फ्रान्सिस पाठेकर, उपप्राचार्य फादर राजा, व्यवस्थापक फादर फ्रान्सिस डिसुझा आणि डॉ विल्सन अँड्र्यू यांच्या हस्ते करण्यात आले.

