ST Bus Employee Protest: राज्यभरात पुन्हा लालपरीची चाके थांबणार? कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष, काय आहे मागणी?
ST Employee Protest: कर्मचाऱ्यांच्या मासिक भत्त्याबाबत राज्य सरकारने तातडीने निर्णय न घेतल्यास एसटी बंद करण्याचा इशारा

ST Bus Employee Protest: राज्यभरात पुन्हा एकदा एसटी बंद करण्याचा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या भत्ता प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
याबाबत आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांच्या मासिक भत्त्याबाबत राज्य सरकारने तातडीने निर्णय घेतला नाही, तर एसटी बंद करण्याचा इशारा कर्मचारी संघटनांनी केला आहे.
केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार राज्य सरकारच्या अर्थ विभागाने ११ डिसेंबर १९९८ रोजी एसटी महामंडळातील आगारांची शहरनिहाय अ १, अ, ब १, ब २ अशी वर्गवारी केली.
त्यानुसार ‘अ १’ वर्गवारीतील एसटी कर्मचाऱ्यांना दरमहा ३०० रुपये, ‘अ’ वर्गातील कर्मचाऱ्यांना ६ हजार रुपयांपेक्षा जास्त मूळ वेतन असल्यास कर्मचाऱ्यांना २४० रुपये मासिक भत्ता देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
त्यानुसार पुणे विभागातील कर्मचारी ‘अ’ वर्गात मोडत असल्याने त्यांना प्रतिमाह २४० रुपये मासिक भत्ता मिळणे अनिवार्य आहे. मात्र, गेल्या दोन दशकांपासून कर्मचाऱ्यांना जुन्या दरानुसार प्रतिमाह ६५ रुपये मासिक भत्ता देण्यात येत आहे.
Pune Police : बांगलादेशी तरुणीवरची कारवाई टाळली; महिला पोलिसाच्या निलंबनाचे आदेश
नियमाप्रमाणे मासिक भत्ता दिला जात नसल्याचा आरोप
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना शहराच्या श्रेणी आणि वर्गनिहाय मासिक वेतनानुसार मासिक पूरक भत्ता ठरवून दिला आहे. मात्र, अनेक शहरांतील कर्मचाऱ्यांना नियमाप्रमाणे मासिक भत्ता दिला जात नसून, याबाबत वारंवार मागणी करण्यात आल्यानंतरही याबाबत योग्य निर्णय न घेतल्यास राज्यात एसटी बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेचे सचिव दिलीप परब यांनी दिला आहे. ST Bus Employee Protest
दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेकडून त्यासाठी सरकारला ३ दिवसांचा वेळ दिला आहे. यावर राज्य सरकारकडून काय निर्णय घेतला जाणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. अन्यथा एसटी बंद राहिल्यास प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. ST Bus Employee Protest
हेही वाचा:
Abroad Jobs : परदेशात नोकरी हवीय? महाराष्ट्र सरकारची ‘ही’ नवीन संस्था करणार स्वप्न पूर्ण..जाणून घ्या






