एसटी महामंडळाची धार्मिकस्थळी विशेष बस सेवा सुरु; आमदार विठ्ठलराल लंघे पाटील यांचे भाविक भक्तांतून मोठे कौतुक

नेवासा: श्रीक्षेत्र नेवासा शहरासह तालुक्यातील सर्वसामान्य भाविक भक्तांसह वारकरी संप्रादयातील भाविकांना धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने श्रीक्षेत्र देवगड ते श्रीक्षेत्र पंढरपूर अशी बससेवा करु करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासूनभाविकांतून केली जात होती. या मागणीची प्रत्यक्षात दखल घेत आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील यांनी रविवार (दि.२२) रोजी ही एसटी बससेवा सुरु केली झाली आहे.
श्रीक्षेत्र देवगड देवस्थानचे प्रमुख गुरुवर्य भास्करगिरी महाराज आणि आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी सकाळी या बसचे विधिवत पुजन करुन ही सेवा सुरु करण्यात आली. यामुळे वारकरी मंडळीतून मोठा आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे.
यावेळी मुरमेचे सरपंच अजय साबळे, नवनाथ साळुंके, संदीप साबळे, सुधीर चव्हाण यांच्यासह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी श्रीक्षत्र देवगड देवस्थानचे प्रमुख गुरुवर्य भास्करगिरी महाराज आणि आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या शुभहस्ते बसचे विधिवत पुजन करुन या बससेवेला प्रारंभ करण्यात आला. त्यामुळे नेवासा तालुक्यातील भाविकांना श्रीक्षेत्र देवगड येथून श्रीक्षत्र पंढरपुर येथे विठ्ठूरायांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी हा मार्ग सुकर झाल्यामुळे आमदार विठ्ठलराल लंघे पाटील यांचे भाविक भक्तांतून मोठे कौतुक केले जात आहे.





