ST Bus: एसटीला फायदा! एसटीच्या डिझेल सवलत दरात 30 पैशांची वाढ
Updated On:

मुंबई – इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडून एसटी महामंडळ इंधन खरेदी करत आहे. सध्या एसटी महामंडळाला दररोज सरासरी १० कोटी ७८ लाख लिटर डिझेल लागते.
यासंदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मंत्रालयात बैठक घेण्यात आली.
या बैठकीत येत्या १ ऑगस्टपासून मुळ सवलत दरात प्रति लिटर ३० पैसे वाढ करण्याचे संबंधित कंपन्यांनी मान्य केले आहे. यामुळे प्रति लिटर ३० पैसे वाढीव सवलत दिल्यामुळे वर्षाकाठी एसटी महामंडळाची अंदाजे १२ कोटी रुपयांची अतिरिक्त बचत होणार आहे.





