मालेगावात एसटी बस उलटली ; 35 शाळकरी विद्यार्थी जखमी
Updated On:

मालेगाव – मालेगावात एसटी महामंडळाची मळगाव-नांदगाव बस उलटली असून या बसमधील 30 ते 35 शाळकरी मुले जखमी झाली आहेत. ही बस नांदगाव आगाराची असून मळगाव वरुन नांदगावला जात असताना ती रस्त्यात उलटली आहे.
यात बस चालक आणि वाहकासह तीस ते पस्तीस शाळकरी मुले जखमी झाली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.जामदरी ते कळमदरी रस्त्यावर हा अपघात झाला. या अपघातातील जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात आणले आहे. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झालेली नाही.





