SSMB29 साठी तब्बल ‘इतक्या’ कोटींचे बजेट; आकडा ऐकून थक्क व्हाल, चित्रपटात AI चा वापर, महेश बाबूच्या लूकचीही जोरदार चर्चा

महेश बाबू आणि एसएस राजामौली यांचा SSMB29 हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाबद्दल कोणतीही अधिकृत माहिती नसली तरी दक्षिणात्य अभिनेता महेश बाबूने SSMB29 चित्रपटातील एक फोटो शेअर केला असल्याचे बोलले जात आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाच्या अनुषंगाने काही ना काही गोष्टी समोर येत आहेत. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
ज्यामध्ये महेश बाबू जिममध्ये दिसत आहेत. लांब केस आणि वाढलेली दाढी पाहून लोक असा अंदाज लावत आहेत की हा त्याच्या पुढच्या चित्रपट SSMB29 चा पुढचा लूक असू शकतो. महेश बाबू याआधीही अनेक कार्यक्रमांमध्ये वाढलेल्या केसांसह दिसला होता. SSMB29 या चित्रपटासाठी त्याचा हा लूक केला असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. या चित्रपटाचा फॅार्म अॅडव्हेंचर असून त्यामुळे महेश बाबूच्या लूकची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे.
https://twitter.com/ssmb291_/status/1895104636329095474
चित्रपटात AI चा वापर
महेश बाबूच्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाकांक्षी SSMB29 चित्रपट म्हणून या चित्रपटाकडे पाहिले जाते. तर राजामौली यांना या चित्रपटामधून या अगोदर भारतीय चित्रपटसृष्टीत झाले नाही, असे काही दाखवायचे असल्याचे बोलेले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटासाठी तो केवळ व्हीएफएक्समध्येच नाही तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात एआयचे प्रशिक्षणही घेत आहे. या चित्रपटात AI चा वापर करून काही गोष्टी तयार करण्यात येणार आहे. महेश बाबू आणि राजामौली या दोघांच्याही कारकिर्दीतील हा पूर्णपणे नवीन आणि वेगळा प्रोजेक्ट ठरणार आहे.
तब्बल 900 ते 1000 कोटींचे बजेट
या चित्रपटात महेश बाबूसोबत प्रियांका चोप्रा असणार असल्याची बातमी आहे. चित्रपटात तिची नकारात्मक भूमिका असणार आहे. या चित्रपटाचे बजेट तब्बल 900 ते 1000 कोटींपेक्षा अधिक असल्याचे बोलले जात आहे. SSMB29 साठी जगभरातून कलाकारांच्या निवडीची प्रक्रिया केली जात आहे. इंडोनेशियन अभिनेत्री चेल्सी इसलनचे नाव चित्रपटाशी सतत जोडले जात आहे, परंतु निर्मात्यांनी याबद्दल कोणतीही पुष्टी केलेली नाही. हा चित्रपट याच वर्षी रिलीज केला जाऊ शकतो अशी माहिती आहे, पण अद्यापर्यंत याबाबत अशी कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.





