पुणे जिल्हा | श्रीनाथ म्हस्कोबास “सर्वोत्कृष्ट पुरस्कार

राहू (वार्ताहर)- दि. डेक्कन शुगर टेक्नोलॉजीस्टस असोसिएशन, पुणे (DSTA) या संस्थेचे ६९ वे वार्षिक अधिवेशन पुणे येथे आयोजित केले होते.
DSTA संस्थेचे २०२४ चा “सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार” अध्यक्ष राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचे हर्षवर्धन पाटील, साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांच्या हस्ते व डीएसटीएचे अध्यक्ष शहाजीराव भड यांच्या उपस्थितीत श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्यास प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार कारखान्याचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक डॉ. पांडुरंग राऊत, कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक व सभासद तसेच कर्मचारी यांचे वतीने कारखान्याचे संचालक महेश करपे, संचालक भगवान मेमाणे, लक्ष्मण कदम, चंद्रकांत ढमढेरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एम. रासकर यांनी स्वीकारला.
याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी पी. एम. मते, सरव्यवस्थापक (टेक्नीकल) आर. एन. यादव, सरव्यवस्थापक (डीस्टीलरी आणि बायप्रोडकट्स) आर. एस. शेवाळे, केन मॅनेजर एस. बी. टिळेकर, चिफ इंजिनीअर एन. ए. भुजबळ उपस्थित होते. DSTA संस्था ही साखर उद्योगाच्या विकासासाठी कार्य करणारी देश पातळीवरील संस्था आहे. याचीच दखल या संस्थेने घेतली आहे.
कारखान्याचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक डॉ. पांडुरंग राऊत म्हणाले की, श्रीनाथ म्हस्कोबा कारखाना दिवसेंदिवस प्रगती करीत आहे.
त्याचे सर्व श्रेय शेतकरी, सर्व संचालक, सभासद, अधिकारी, कर्मचारी व हितचिंतक यांचे आहे. शेतकरी बांधवांना ऊस उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शन करण्यात, वेळेवर ऊस तोडणी व पेमेंट देणेत कारखाना नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे. सर्व बाबीतून मार्गक्रमण करून आज श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्याची ओळख देशपातळीवर झालेली आहे.




