Kanhaiya Kumar On BJP : भारतीय जनता पक्ष रामाचे नाव घेऊन प्रत्यक्षात नथुरामच्या विचारसरणीचा जातीय व फुटरीतावादी अजेंडा राबवत आहे असा आरोप काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी केला आहे.
एका वृत्तसंस्थाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. ते म्हणाले की, भाजपने गांधी-नेहरू घराण्याच्या योगदानाला कमी लेखण्याचा प्रयत्न सातत्याने केला आहे. | Kanhaiya Kumar On BJP
रामाच्या संकल्पनेत कोणाच्याही द्वेषाला वाव नाही, असे सांगून हिंदू धर्माचे मोठेपण कमी करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा दावाही कुमार यांनी केला. देशात प्रभू रामाची लाट आली तर त्यात चुकीचे काही नाही, देशात नथुराम लाट आली तर मात्र ती चूक ठरेल.
जे लोक रामाला मानतात त्यांना कसे फसवायचे यात भाजप मग्न आहे, त्यामुळे फक्त रामाचे नाव घेतले जाते, पण त्यांची कृती मात्र नथुरामची आहे. या खेळाचा फायदा भाजपला होतो,असे ते म्हणाले. | Kanhaiya Kumar On BJP